14 वर्षांचा आर. प्रागनानंदा ठरला ग्रॅंडमास्टर! भारताला मिळवून दिले असामान्य यश

14 वर्षांचा आर. प्रागनानंदा ठरला ग्रॅंडमास्टर! भारताला मिळवून दिले असामान्य यश

प्रागनानंदनं अंडर-19 विश्व खुल्या वर्गात सुवर्ण पदक जिंकले.

  • Share this:

चेन्नई, 13 ऑक्टोबर : विश्व युवा बुध्दीबळ चॅम्पियनशीप स्पर्धेत 14 वर्षीय आर. प्रागनानंदानं सुवर्ण कामगिरी केली आहे. शनिवारी झालेल्या स्पर्धेत प्रागनानंदनं अंडर-19 विश्व खुल्या वर्गात सुवर्ण पदक जिंकले. प्रागनानंदानं 11व्या आणि अंतिम दौऱ्यात जर्मनीच्या वालेंटिनसोबत ड्रॉ खेळी केली. ज्यात तो 9 गुणांसह पहिल्या स्थानावर होता. भारतानं या सुवर्ण पदकासह 6 आणखी सुवर्ण पदक जिंकले आहे. यात 3 रौप्या तर 3 कांस्य पदक आहेत.

या स्पर्धेत भारतानं असामन्य कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी एकाच दिवशी एकूण 7 पदक मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीत भारताकडून आर प्रागनानंद देशातला पहिला युवा आणि जगातला दुसरा सर्वात युवा ग्रॅंडमास्टर ठरला आहे. प्रागनानंदा 12 वर्ष, 10 महिने आणि 13 दिवसांनी ग्रॅंडमास्टर ठरला. त्यानं इटलीमध्ये ग्रेनडाईन ओपन स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत ही कामगिरी केली.

दरम्यान एएनआयशी बोलताना प्रागनानंदची बहिण वैशाली हिनं, “आम्हाला खुप अभिमान आहे. मी व्हिडीओ पाहिला. त्याला पाहताना आनंद झाला. त्याच्या मेहनतीचे फळ त्याल मिळाले”, असे सांगितले. दरम्यान याआधी उक्रेनच्या सर्गेई कार्जाकिननं अजूनही जगातील सर्वात युवा ग्रॅंडमास्टर आहे. त्यानं 2002मध्ये वयाच्या 12व्या वर्षी ग्रॅंडमास्टर ठरला होता.

या स्पर्धेत असे मिळाले भारताला पदक

अंडर-18 ओपन: आर. प्रागनानंदा (सुवर्ण पदक)

अंडर-18 गर्ल्स: वंतिका अग्रवाल (रौप्य मेडल)

अंडर-16 ओपन: अरोन्याक घोष (कांस्य मेडल)

अंडर-14 ओपन: श्रीहरी एल.आर. (रौप्य), श्रीश्वान मरालक्षीकरी (कांस्य)

अंडर-14 गर्ल्स: दिव्या देशमुख (रौप्य), रक्षिता रवि (कांस्य)

VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: chess
First Published: Oct 13, 2019 05:31 PM IST

ताज्या बातम्या