दुबई, 8 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी भारतीय क्रिकेट टीम (India out of T20 World Cup semifinal race) यंदा सेमी फायनलमध्येही प्रवेश करू शकली नाही. स्पर्धेतील टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. याच गोष्टीची संधी साधत पाकिस्तानकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मात्र, टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफरने (Wasim Jaffer) भन्नाट उत्तर देत डिवचणाऱ्या पाकिस्तान युजर्सची बोलती बंद केली आहे. सध्या त्याचे हे ट्विट व्हायरल होत आहे.
टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजमधूनच टीम इंडिया (Team India) आऊट झाली आहे. रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा (New Zealand vs Afghanistan) पराभव केला, त्याचबरोबर भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्नही भंगलं.
T20 World Cup: टीम इंडियाचे 3 खेळाडू ठरले विराटसाठी व्हिलन!
टीम इंडियाच्या याच अपयशाची संधी साधत पाकिस्तानच्या एका युजर्सने ट्विट करत “तुम्हाला कसं वाटतंय भारतीय चाहत्यांनो?” असा सवाल करत भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याच प्रयत्न केला. मात्र या ट्विटर वसीम जाफरने त्याच्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
“12-1 ला मजबूत जेवलोय. पोट अजूनही भरल्यासारखं वाटतंय,” असं वसीम जाफरने हे ट्विट कोट करुन रिट्विट करत उत्तर दिले. त्याचे हे भन्नाट ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Had a heavy lunch between 12-1, still feeling full 😉 #NZvsAfg #T20WorldCup https://t.co/wJ58RUSnh0
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 7, 2021
भारत आणि पाकिस्तानदरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत म्हणजेच यंदाचा सामना धरुन एकूण 13सामने झालेत त्यापैकी 12 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवलाय. तर पाकिस्तानने यंदा पहिल्यांदाच भारताला विश्वचषकात पराभूत करुन भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीची आकडेवारी 12 विरुद्ध 1 विजय अशी केलीय. त्यावरुनच जाफरने खोचकपणे 12-1 असा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केलाय.
विल्यमसननं विराटला दिली आयुष्यभराची जखम, सलग तिसऱ्यांदा मोडलं स्वप्न
सोमवारी टीम इंडियाचा सामना दुबळ्या नामिबियाविरुद्ध (India vs Namibia) होणार आहे, पण सेमी फायनलचं आव्हान संपुष्टात आल्यामुळे या मॅचला काहीच अर्थ उरलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup