मुंबईतील विजयनगर सोसायटीमध्ये राबवला जातोय शून्य कचरा प्रकल्प

मुंबईतील विजयनगर सोसायटीमध्ये राबवला जातोय शून्य कचरा प्रकल्प

  • Share this:

रेणुका जोशी,मुंबई

07 मे : मुंबईतल्या अंधेरीच्या विजयनगर कॉलनीमध्ये शून्य कचरा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवला जातोय. या प्रकल्पामुळे कॉलनीतला वर्षभरातला तब्बल100 टन कचऱ्याचा बोजा महापालिकेकडे जात नाही.

शहरातला कचरा कमी करण्यासाठी, घनकचरा व्यवस्थापनासाठी, या कॉलनीतल्या नागरिकांनी पुढाकार घेतलाय. रोजचा तब्बल 150 किलो ओला कचरा, 150 किलो सुका कचरा आणि सॅनिटरी नॅपकिन्स,डायपर्सचा 40 किलो कचरा जमा होतो. ओला कचरा खतनिर्मितीसाठी कंपोस्ट पीटसमध्ये नेला जातो. सुका कचरा पुनर्निमितीसाठी आकार या एनजीओला दिला जातो आणि डायपर्ससारखा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर पाठवला जातो.

तुम्ही ओल्या कचऱ्यात काय टाकू शकता याची यादी :

हे ओल्या कचऱ्यात टाकू शकता

- भाज्यांची देठं

- फळांची सालं

- खरकटं

- खराब झालेलं अन्न

- बुरशी आलेलं अन्न

- घरात येणारी धूळ

- गुंतवळ

- नखं

- चहाची पूड

सुक्या कचऱ्यात तुम्ही काय टाकू शकता पाहूया

- सुका कचरा

- कागद

- प्लास्टिक

- धातू

- काच

- थर्माकॉल

- पॅकिंगमध्ये येणाऱ्या गोष्टी

- लाकूड

हे कचऱ्यात टाकू नका

सॅनिटरी नॅपकिन्स

डायपर्स

युरिनरी बॅग्स

सीरींज

कॉलनीमध्ये उभारण्यात आलेल्या पिटसमध्ये हा कचरा रोजच्या रोज ढवळला होतो. कचऱ्याचं खतात रुपांतर करण्यासाठी लागणाऱ्या विघटनशील जीवाणूंचा साठा या हौदात टाकलेला असतो. १० पिट्समध्ये टाकलेला सर्व कचरा रोज ढवळला जातो, तयार झालेल्या खताला ऊन देण्यासाठी ते गच्चीत पसरलं जातं. आणि क्रशरच्या साहाय्यानं ते खत बारीक केलं जातं. ३ परिसर भगिनी या कचऱ्याचं अक्षरश: सोनं करतात.

3 परिसर भगिनी आणि त्यांच्या पर्यवेक्षक मिळून एकूण २६००० रुपये दिले जातात. कॉलनीतल्या झाडांना वापरल्यानंतर उरलेल्या खतांची विक्री शेतकरी , फार्म हाऊसेस, नर्सरी आणि लॅन्डस्केपसाठी केली जाते.

विजयनगरच्या या मोहिमेला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. वर्षा बापट,सुकृता पेठे आणि सुसज्ज स्वयंसेवकांची फौज यामुळेच हे शक्य होतं.

याव्यतिरिक्त आंब्याच्या कोई, जांभळाच्या , फणसाच्या , चिकूच्या बिया उन्हात वाळवून माती आणि खत मिसळून पिशवीत भरल्या जातात. एक दीड फुटापर्यंत वाढ झाल्यानंतर हरियाली या संस्थेला दिल्या जातात. आणि यासाठी कॉलनीतले लिटिल फार्मर्स पुढाकार घेतायत. पुढच्या पिढीपर्यंत खऱ्या अर्थानं हे बाळकडू पोचतंय.

रेणुका जोशी,मुंबई

First published: May 7, 2017, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading