News18 Lokmat

फवारणी जीवावर बेतली,यवतमाळमध्ये कीटकनाशकामुळे 17 शेतकऱ्यांचा मृत्यू

ही कीटकनाशकं आता अळ्यांपेक्षा फवारणी करणाऱ्यासाठी जीवघेणी ठरतायत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जूलैपासून १७ शेतमजुरांनी फवारणीनंतर आपला जीव गमावला. आतापर्यंत 692 लोकांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2017 11:46 PM IST

फवारणी जीवावर बेतली,यवतमाळमध्ये कीटकनाशकामुळे 17 शेतकऱ्यांचा मृत्यू

भास्कर मेहरे, यवतमाळ

02 आॅक्टोबर : पिकावरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी नवनवीन कीटकनाशकांचा उपयोग करतात. मात्र ही कीटकनाशकं आता अळ्यांपेक्षा फवारणी करणाऱ्यासाठी जीवघेणी ठरतायत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जूलैपासून १७ शेतमजुरांनी फवारणीनंतर आपला जीव गमावला. आतापर्यंत 692 लोकांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातले कळंब इथले दिवाकर मडावी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची देखभाल करत होते. नेहमी प्रमाणे ते फवारणी करण्यासाठी शेतात गेले. फवारणी करून घरी परतल्या नंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांच्यावर उपचार सुरू होता मात्र प्रकृती खालावतच गेली. शेवटी १२ दिवस उपचारनंतर  त्यांचा मृत्यू झालाय.

यावर्षी चांगला पाऊस झाला.. पिकं उत्तम आली आहे. मात्र किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांनी किटकनाशक फवारणी सुरू केलीय. मात्र ही फवारणी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलीये. फवारणीमुळे झालेल्य विषबाधेमुळे जुलैपासून १७ शेतकऱ्यांनी गमावलाय. तर तब्बल 669 शेतकऱ्यांना विषबाधा झालीये.

या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासनाला मागितला आहे. त्यानंतर पुण्यावरून कृषी आयुक्तालयाची चमू जिल्ह्यात या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यासाठी नुकतीच येऊन गेली. त्या समितीने कपाशीची उंची वाढल्याने आणि शेतकरी फवारणीदरम्यान योग्य काळजी घेत नसल्याने या घटना घडत असल्याची नोंद अहवालात केली. पण शेतकरी फवारणीसाठी चायनीज पॉवर स्प्रे-पंपाचा वापर करीत आहेत. त्या पंपाची क्षमता देशी पंपापेक्षा पाचपट जास्त आहे.

Loading...

तसंच वापरले जाणारे कीटकनाशक अतिशय उग्र स्वरूपाचे आहे. दोन ते तीन औषधांचे मिश्रण करून शेतकरी फवारणी करीत आहे. त्यामुळे विषाची मात्रा एकदम वाढून त्याचा दुष्परिणाम होत आहे. तर जिल्ह्यात यंदा चोरबीटी मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहे.

बीटी कपाशीवर बोंडळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. अतिशय विषारी औषधानेही कीड नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी वारंवार उग्र स्वरूपाचे विषारी द्रव्य फवारत आहे. या प्रमुख कारणांचा ऊहापोहदेखील अहवालात करण्यात आला नाही. तसंच बाधित शेतकऱ्यांचे सर्वेक्षणही शासनाकडून अद्याप सुरू झालेले नाही.

दरम्यान, या प्रकरणात सरकार लक्ष घालून असल्याच सांगत या प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्याचे आश्वासन महसूल राज्य मंत्री संजय राठोड यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 10:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...