मिस वर्ल्ड मानुषीच्या मुकुटाची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल !

मिस वर्ल्ड मानुषीच्या मुकुटाची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल !

मानुषीला मिस वर्ल्डचा किताब देताना मुकुट घालण्यात आला. या मुकुटाची खासियत सांगायची झाली तर...

  • Share this:

27 नोव्हेंबर : 'मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर'च्या यशानंतर तिला जगभरातून कौतुकाची छाप मिळतेय. या यशामुळे ती सोशल मीडियावरही ती चांगलीच गाजतेय. पण आपल्या या हरियाणाच्या छोरीच्या 'मिस वर्ल्ड'या मानाच्या मुकुटाबाबत आपल्या सगळ्यांना फार कमी माहिती आहे. त्याचबरोबर तिने परिधान केलेल्या ड्रेसची खासियत ही जरा वेगळीच आहे?

आपल्या लाडक्या मानुषीला मिस वर्ल्डचा किताब देताना मुकुट घालण्यात आला. या मुकुटाची खासियत सांगायची झाली तर हा '7,50,000 डाॅलर म्हणजेच भारतीय चलानात '4,85,10,375' रुपयांचा आहे. झालात ना थक्क !

होय, तुम्हाला शब्दात सांगयचं झालं तर हा मुकुट 4 कोटी 85 लाख 10 हजार 375 रुपयांचा आहे. हा मुकुट 'Czech jeweller'कडून तयार करण्यात आला आहे.

यात न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध आणि मोठ्या हिऱ्यांचा वापर केला आहे. अनेक महागड्या हिऱ्या, माणकांनी हा मुकुट बनवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा तिसरा महागडा मुकुट आहे. या मुकुटात शुद्ध मोती, सोने, चांदी आणि हिरे यांचा वापरही करण्यात आला.

मंडळी हे झालं मुकुटाचं...तिने घातलेल्या ड्रेसची तर गोष्टच काही वेगळी आहे. 20 वर्षीय मिस वर्ल्ड मानुषीनं घातलेला ड्रेस तिच्या या स्पर्धेतलं विशेष आकर्षण होतं.

तिने घातलेल्या या मोठ्या आणि सुंदर ड्रेसची किंमतही तितकीच आश्चर्यचकीत करणारी आहे. तिने घातलेल्या या ड्रेसची किंमत '5 लाख' रुपये आहे.

हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर 'डू फाल्गुनी' आणि 'शॅन पिकॉक'नं डिझाईन केला आहे. या ड्रेससाठी महागडे हिरे वापरण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 04:43 PM IST

ताज्या बातम्या