राष्ट्रवादीतून पुणेरी पगडी हद्दपार, पवारांनी का घेतला निर्णय ?

राष्ट्रवादीतून पुणेरी पगडी हद्दपार, पवारांनी का घेतला निर्णय ?

टिळक वापरत होते ती पुणेरी पगडी, महात्मा फुले वापरायचे ती फुलेपगडी आणि शिंदेंशाही पगडी या विद्वत्ता,सामाजिक सलोखा आणि वीरता याचं प्रतीक मानल्या जातात.

  • Share this:

अद्वैत मेहता,पुणे

11 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फक्त फुले पगडी घातली जाईल असा सुचनावजा इशारा दिला आणि यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय..याबदद्लचा हा रिपोर्ट

पाहुण्याचं आदरातिथ्य करताना पुण्यात दिसणारं हे चित्र तसं नेहमीचंच...(हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेत शरद पवारांचा सत्कार पुणेरी पगडी घालून करण्यात आला)

पण आता या पगडीलाही जात चिकटलीय. पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेत शरद पवारांनी भुजबळांच्या सत्कारा वेळी पुणेरी नाही तर फुले पगडी घालून सत्कार करण्याची अशी जाहीर सूचना केली.

पवार येवढ्यावरच थांबले नाहीत तर भविष्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार करण्याचा जणू फतवाच जारी केला. विशेष म्हणजे खुद्द भुजबळ यांनी भाषणात सर्व जाती ,धर्म, समाज यांना बरोबर घेऊन जाऊ असं वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा पगडीचा बाऊंन्सर टाकला.

 VIDEO - पवारांनी भुजबळांना घातली फुले पगडी

शरद पवार यांना निवडणुकीच्या तोंडावर जात आठवते असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर ब्राम्हण महासंघानं पवार यांनी जातीयवादी ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप करत निषेध केला. तिकडे काँग्रेसनं पवार यांना जातीय सलोखा राखा असा चिमटा काढला.

टिळक वापरत होते ती पुणेरी पगडी, महात्मा फुले वापरायचे ती फुलेपगडी आणि शिंदेंशाही पगडी या विद्वत्ता,सामाजिक सलोखा आणि वीरता याचं प्रतीक मानल्या जातात. मात्र या पगड्यानाही जातीची लेबले चिकटवल्यानं 'सिर सलामत तो पगडी पचास' वाली पगडीही वादात सापडलीय.

First published: June 11, 2018, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading