...जेव्हा मंत्री तावडेच सचिवाच्या दालनात जाऊन भेटतात !

...जेव्हा मंत्री तावडेच सचिवाच्या दालनात जाऊन भेटतात !

सर्वसाधारणपणे प्रोटोकॉलनुसार विविध बैठकांसाठी संबंधीत सचिव हे मंत्र्यांच्या दालनात बैठकीत जात असतात पण बुधवारी आपल्या राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चक्क सचिवाचेच दालन गाठलं.

  • Share this:

संजय सावंत, प्रतिनिधी

मुंबई, 12 जुलै : सर्वसाधारणपणे प्रोटोकॉलनुसार विविध बैठकांसाठी संबंधीत सचिव हे मंत्र्यांच्या दालनात बैठकीत जात असतात पण बुधवारी आपल्या राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चक्क सचिवाचेच दालन गाठलं.

कारण कायतर म्हणे, त्यांना शालेय खात्यासंबंधीचे प्रश्न सोडवून घ्यायचे होते. असेलही कदाचित पण त्यासाठी तावडे संबंधीत सचिवाला आपल्या दालनातही बोलावून घेऊ शकले असते. पण त्यांनी विद्यार्थी आणि पालकांचा ससेमिरा टाळण्यासाठी थेट शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांचं दालन गाठलं. विशेष म्हणजे मंत्रालयात तावडेंचं दालन हे पहिल्या मजल्यावर तर नंदकुमार यांचं ऑफिस हे चौथ्या मजल्यावर आहे. तरीही तावडे चार मजले चढून त्यांना भेटायला गेले आणि इकडे मंत्री महोदय तावडेंचं दालन मात्र, पालकांच्या तोबा गर्दीने खच्चून भरलं होतं.

काही जणांना अकरावीच्या अॅडमिशनचा प्रश्न सोडवायचा होता. तर कुणाला ऑनलाईन अॅडमिशनसंबंधीच्या तांत्रिक गोंधळावर उत्तर हवं होतं. पण आपले मंत्री महोदय मात्र, एखाद्या फुटकळ संघटनेचे कार्यकर्ते असल्यागत थेट सचिवांकडे प्रश्न सोडवण्यासाठी जाऊन बसल्याचं बघायला मिळालं. आता स्वतः तावडेच आपल्या मंत्रीपदाचा हा असा आब घालवत असतील तर अधिकारी हे शिरजोर होणारच असंच इथं खेदानं नमूद करावं लागेल. झाल्या प्रकाराबाबत आम्ही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

नवाब मलिक, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी

''आपले बिचारे शिक्षण मंत्री महोदय विनोद तावडे यांचं शिक्षणच मुळात बारावीपर्यंत झालं असल्याने त्यांना प्रोटोकॉल वैगरे तरी कसा माहित असणार, सचिवांकडे जाऊन बसण्यापेक्षा त्यांनी विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवण्याकडे लक्षं द्यावं''

First published: July 12, 2017, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading