मुंबईकरांनो, प्लास्टिक बाटल्या रिसायकलिंग मशिनमध्ये टाका आणि पैसे कमवा!

मुंबईत वेस्टर्न रेल्वेच्या स्टेशन्सवर 10 प्लास्टिक रिसायकलिंग मशिन्स लावण्यात आल्या आहेत.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 22, 2017 10:34 AM IST

मुंबईकरांनो, प्लास्टिक बाटल्या रिसायकलिंग मशिनमध्ये टाका आणि पैसे कमवा!

महेंद्र मोरे, मुंबई

18 मे : प्लास्टीकच्या बाटल्यांचा कचरा दिवसेंदिवस डोकेदुखी ठरतोय. या डोकेदुखीवर प्लास्टिक रिसायकलिंग मशिनचा मेक इन इंडिया उपाय शोधण्यात आला आहे.

मुंबईकरांनो प्लास्टिकच्या बाटल्या  इकडे-तिकडे फेकू नका तर त्या बाटल्या प्लास्टिक रिसायकलिंग मशिनमध्ये टाका आणि पैसे कमवा. मुंबईत वेस्टर्न रेल्वेच्या स्टेशन्सवर 10 प्लास्टिक रिसायकलिंग मशिन्स लावण्यात आल्या आहेत.

मशिनमध्ये प्लास्टिकची बाटली टाकली की ती बाटली क्रश केली जाते. आणि मग लगेचच स्क्रीनवर तुम्हाला कोणते डिस्काउंट कुपन पाहिजे ते निवडण्याचे पर्याय समोर येतात.

Loading...

- पेटीएम बस कुपन 100 रूपये

- पेटीएम विमान तिकीट कुपन 750 रूपये

- सहकारी भांडार डिस्काउंट कुपन

- कुपन डोनेट करू शकता.

क्रश्ड पाल्स्टिकपासून यार्न तयार करण्यात येणार आहे. या यार्नपासून टी शर्ट तयार करून ती गरजू मुलांना वाटली जाणार आहेत. परदेशात अनेक मोठ्या सुपर मार्केट्सच्या बाहेर या मशिन्समध्ये प्लास्टीक रिसायकलिंग मशिन्स लावण्यात आल्या आहेत. मग अशा मशिन्स भारतात का नको या संकल्पनेतून हरिश कारंडे यांनी मेक इन इंडिया प्लास्टिक रिसायकलिंग मशिन्सचा प्रयोग वेस्टर्न रेल्वेवर सुरू केलाय.

मुंबईत वेस्टर्न रेल्वे नविन प्रयोग करण्यात अग्रेसर असल्याचे नेहमीच पहायला मिळते. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक रिसायकलिंग मशिन्स उत्तम पर्याय असल्याचे वेस्टर्न रेल्वेचे मत आहे आणि प्रवासीदेखील या मशिनचा चांगला वापर करत आहेत. सुरूवातीला रेल्वे स्टेशनच्या कोपऱ्यात दिसणारे हे मशिन नक्की काय आहे याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम असतो पण एकदा का मशिनचे फायदे समजले की गर्दी जमायला सुरूवात होते आणि प्लास्टिकचा कचरा इतरत्र फेकता कामा नये हा संदेश घेऊनच लोक मशिनचा ताबा सोडतात.

प्लास्टिकचा कचरा इतरत्र फेकला जाऊ नये यासाठी वीणा यादव यांनी त्यांच्या मुलांना प्लास्टिक रिसायकलिंग मशिन कशी काम करते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. देशातील सर्व गर्दीच्या ठिकाणी या प्लास्टिक रिसायकलिंग मशिन्स लावल्या जाव्यात यासाठी मशिनचे प्रमोटर्स प्रयत्न करत आहेत.

सध्या प्लास्टिक कचऱ्याचा राक्षस जगासमोर आ वासून उभा आहे. चीनमध्ये एकट्या बिजींग शहरात 3000 प्लास्टिक रिसायकलिंग मशिन्स आहेत. तर शांघायमध्ये 1800 मुंबईत मात्र या मशिन्सची संख्या फक्त दहाच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2017 04:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...