वडोदरा, 29 मे : गुजरातमधील वडोदरा शहरातील निशिता राजपुतने सुरू केला एक वेगळा उपक्रम ज्याला मिळत आहे सर्वाकडून मदतीचा हात. निशिताचा हा उपक्रम म्हणजे ती दरवर्षी हजारों गरीब मुलांच्या शाळेची फी भरत असते. गरीब मुलांचे शिक्षण बंद होऊ नये यासाठी ती हे काम करत आहे. यासाठी ती वर्षाला एक कोटी रूपयापर्यंत पैसे जमा करून मुलांची 'फी'जमा करत असते.
निशिताने गरीब मुलांची 'फी' भरण्याची सुरुवात 7 वर्षापूर्वी केली होती. तिने पहिल्या वर्षी 351 विद्यार्थ्यांची फी भरली होती. आणि तिथूनच तिच्या या चांगल्या कामाची सुरुवात झाली. आता या कामाची व्याप्ती वाढलीय. तिला या कामासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देणग्या मिळतात. गेल्या वर्षी तिने 67 लाखाचे चेक जमा केले होते.
यावर्षी ती 10 हजार विद्यार्थ्यांची फी भरणार आहे. यासाठी ती 1 कोटी रूपये जमा करणार आहे. तिच्या या कामाबद्दल सर्व स्तरावरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. ती तरूणांसाठी रोल मॉडेल म्हणून समोर येत आहे.
निशिता आपल्या या कामामधून पंतप्रधानांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या भिनयाला एक प्रकारे पुढे नेण्याचे काम करत आहे. निशिताने दिलेले पैसे हे शाळेच्या आकाउंटमध्ये जमा केले जातात आणि याची माहिती विद्यार्थ्यांना पण दिली जाते. तिच्या कामाच्या याच पारदर्शकतेमुळे तिला देश-विदेशातून आर्थिक मदत मिळत आहे, त्यामुळेच ती आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.