S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंतप्रधानपदाबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी? UNCUT मुलाखत
  • VIDEO : पंतप्रधानपदाबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी? UNCUT मुलाखत

    Published On: Mar 15, 2019 10:21 PM IST | Updated On: Mar 15, 2019 10:34 PM IST

    15 मार्च :'पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवार यांचं नाव आहे. मी आधीच पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळीही भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील', असा विश्वास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. गडकरी यांनी न्यूज18 लोकमतला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं. 'फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कामं केली असून यात ते पास झाले आहे. त्यांनी जी जी कामं सांगितली होती, ती त्यांनी करून दाखवली आहे. गेल्या 25-30 वर्षात राज्यात जेवढी कामं झाली नाही, तेवढी कामं त्यांनी करून दाखवली. राजकारणापासून ते राज्याच्या विकासकामांपर्यंत त्यांची कामगिरी सरस राहिली' अशी स्तुतीही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close