आता बोला !, भाजपच्याच मंत्र्यांला जीएसटीचा फुलफाॅर्म माहीत नव्हता

आता बोला !, भाजपच्याच मंत्र्यांला जीएसटीचा फुलफाॅर्म माहीत नव्हता

रामपती शास्त्री व्यापाऱ्यांशी जीएसटीवर चर्चा करण्यासाठी आले होते.पण मंत्रिमहोदयांना जीएसटीचा फुलफाॅर्मच सांगता आला नाही.

  • Share this:

30 जून : सरकारी योजनांच्या प्रमोशनसाठी मोठ्या मोहिमा राबवल्या जातात. पण भाजप नेते आणि मंत्र्यांच्या डोक्यात मात्र योजना घुसलेल्या दिसत नाहीयेत. यूपीमधील समाजकल्याण आणि आदिवासी विकासमंत्र्यांना तर जीएसटीचा फुलफाॅर्मच माहीत नसल्याची बाबसमोर आलीये.

देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा एकच सुरू आहे ती जीएसटीची...सरकार लोकप्रबोधनासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवतंय. पण सरकारची जीएसटीची जनजागृतीची मोहीम त्यांच्याच मंत्र्यांपर्यंत पोहचलेली दिसत नाही. यूपी सरकारमधील समाजकल्याण आणि आदिवासी विकासमंत्री रामपती शास्त्रींना जीएसटीचा फुलफॉर्म सांगता येत नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे हे रामपती शास्त्री व्यापाऱ्यांशी जीएसटीवर चर्चा करण्यासाठी आले होते.पण मंत्रिमहोदयांना जीएसटीचा फुलफाॅर्मच सांगता आला नाही.

हे झालं रामपतींचं, मिनाक्षी लेखी या भाजपच्या नेत्यांचंही काही वेगळं नाही मिनाक्षी लेखी यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वच्छ भारत फळ्यावर लिहायला लागलं. काही केल्या त्यांना स्वच्छ भारत लिहता येईना...

उपस्थित लोकांनी सांगितलं तरीही त्यांना लिहता येईना शेवटी आपल्याला स्वच्छ हे अक्षर लिहता येत नाही अशी कबुलीच त्यांना द्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी आणि स्वच्छ भारत मिशनसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावलीये. सरकार जनजागृती करीत असलं तरी भाजपच्याच नेत्यांपर्यंत सरकारच्या मोहिमा पोहचल्या नसल्याचं अधोरेखित झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 08:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading