कलामांना सलामी देण्यासाठी व्हिलचेअरवरुन उठले होते अर्जन सिंह, त्यांच्याबद्दल हे जाणून घ्या !

कलामांना सलामी देण्यासाठी व्हिलचेअरवरुन उठले होते अर्जन सिंह, त्यांच्याबद्दल हे जाणून घ्या !

अर्जन सिंह भारतीय वायुसेनेचे असे एकमेव अधिकारी आहे ज्यांना 2002 मध्ये फील्ड मार्शल बरोबर फाईव्ह स्टार रँक देऊन सन्मान करण्यात आला होता

  • Share this:

16 सप्टेंबर : भारतीय सैन्याच्या इतिहासाचे नायक राहिलेले वायुसेनेचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन झालंय. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. पाकिस्तानच्या विरुद्ध 1965 च्या युद्धात त्यांनी वायुसेनेचं नेतृत्व केलं होतं. या युद्धात पाकिस्तानमध्ये वायुसेनेनं घुसून एअरफील्डस् उद्धवस्त केले होते.

पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं निधन झालं होतं. तेव्हा अर्जन सिंह पालम विमानतळावर पोहोचले होते. कलाम यांना अखेरची सलामी देण्यासाठी व्हिलचेअरवरुन उठून ताठ मानेनं अर्जन सिंह यांनी  सलामी दिली होती. त्यांच्या या सलामीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

अर्जन सिंह यांच्याबद्दल

1) अर्जन सिंह भारतीय वायुसेनेचे असे एकमेव अधिकारी आहे ज्यांना 2002 मध्ये फील्ड मार्शल बरोबर फाईव्ह स्टार रँक देऊन सन्मान करण्यात आला होता. अर्जन सिंह यांना त्यांची सेवा आणि योगदानासाठी 1965 मध्ये पद्म विभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.

2) 2016 मध्ये अर्जन सिंह यांच्या 97 व्या वाढदिवशी पश्चिम बंगाल येथील पानागड स्थित भारतीय वायुसेनेच्या हवाई तळाला त्यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे हयात असताना एखाद्या हवाईतळाला नाव देणारे ते एकमेव असे अधिकारी ठरले.

3) पद्म विभूषण पुरस्कारने सन्मानित अर्जन सिंह यांना वेगवेगळे असे 60 विमानं चालवण्याचा अनुभव होता.

4) 1974 मध्ये त्यांना केनियामध्ये भारतीय उच्चायुक्त नियुक्त करण्यात आलं होतं.

5) 1989 मध्ये त्यांची दिल्लीच्या उप-राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.

6) ब्रिटीश भारतीय सेनेनं अर्जन सिंह यांच्या मदतीमुळे इंफाळवर कब्जा केला होता. त्यानंतर त्यांचा डीएफसी उपाधी देऊन गौरव करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 10:56 PM IST

ताज्या बातम्या