सोलापुरात विद्यापीठ नामांतराचा वाद चिघळला

सोलापुरात विद्यापीठ नामांतराचा वाद चिघळला

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जाहीर केल्याने मोठा वाद निर्माण झालाय.

  • Share this:

13 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जाहीर केल्याने मोठा वाद निर्माण झालाय. शिवा संघटनेनं बंद पुकारून ठिकठिकाणी जाळपोळ केलीये.

सोलापूरमध्ये विद्यापीठाच्या नामांतारचा वाद चांगलाच चिघळलाय. शिवा संघटनेनं दिलेल्या सोलापूर बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाला.  सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव न दिल्याने शिवा संघटनेने सोलापूर आज बंदची हाक दिली होती. काही ठिकाणी तुरळक जाळपोळीच्या घटनाही घडल्या.

२००४ साली विद्यापीठाची घोषणा झाल्यानंतर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती असा दावा शिवा संघटनेने केलाय. तर धनगर समाजाच्या बांधवांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केलंय.

इंदूरमधील विद्यापीठाला यापूर्वीच देवी अहिल्या असं नाव देण्यात आलंय. युजीसीच्या नियमानुसार एका व्यक्तीचे नाव दोन विद्यापीठांना देता येत नाही असा दावाही शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 10:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...