तीन बायका, एका नवरदेवाच्या लग्नाची गोष्ट ऐका !

तीन बायका, एका नवरदेवाच्या लग्नाची गोष्ट ऐका !

जेव्हा रेखा गर्भवती असल्याचं समजलं तेव्हा नक्कालालनं तिघांशीही लग्न करण्याचे ठरवलं. नातेवाईकांच्या उपस्थितीत गुरूवारी त्याने या तिघांशी एकाच मंडपात लग्नसुद्धा केलं.

  • Share this:

राजस्थान, 22 जून : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या जोडप्यांनी लग्न केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण एखादा व्यक्ती एक-दोन नाहीतर तीन महिलांसोबत कित्येक वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिप राहिला आणि त्यानं त्या तिघांशी लग्नसुद्धा केलं हे ऐकायला थोडं विचित्र वाटत ना... हो पण हे खरं आहे. राजस्थानातील आदिवासी भाग असलेल्या उदयपुरमध्ये हे अनोखं लग्न पाहण्यास मिळालं. एका अपंग व्यक्तीनं तीन स्त्रियांशी लग्न करून जिवनभर त्यांच्या सोबत राहण्याचा संकल्प केला आहे.

दक्षिण राजस्थानमधील आदिवासी बहलुलिया भागात बराच काळ लिव्ह-इन-रिलेशनशिप राहून लग्न करण्याची परंपरा आहे. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे.

पीक कर्जासाठी बँक मॅनेजरची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

उदयपूरमधील झाडोल तालुक्यातील आडोल गावात राहणारा 32 वर्षीय नक्कालाल कसोटिया नावाच्या एका अपंग व्यक्तीने गुरुवारी एकाच मंडपात तीन महिलांशी लग्न केलं आहे. नक्कालाल पहिल्या स्त्रीसोबत 12 वर्ष आणि दुसऱ्या स्त्रीसोबत 8 वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. नक्कालालची तिसरी बायको ही 12 वर्षांपासून संबंधात असणाऱ्या महिलेची लहान बहीण असून तिच्यासोबत तो 1 वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होता.

नक्कालालपेक्षा 13 वर्षांनी मोठी

नक्कालालच्या जीवनातील पहिली महिला अलसीगड येथील कंतूबाई ही त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी आहे. गेल्या 12 वर्षापासून नक्कालाल कंतूबाईसोबत राहात होता. पण कंतूबाईबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असताना नक्कालाल गिरवा भागातील फोकटा गावात राहणाऱ्या अपंग असलेल्या पुनकीच्या प्रेमात पडला अन् त्याने तिला चक्क घरी आणलं.

VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!, एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा

गेल्या एका दशकांपासून या दोन्ही स्त्रियांकडून नक्कालालला एकही मुल झालं नाही. अशा परिस्थितीत, नक्कालालनं त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असणाऱ्या कंतूबाईची लहान बहीण रेखाला घरी आणलं. मग या तीन स्त्रियांसोबत तो त्याच्या राहत्या घरी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागला.

प्लास्टिकबंदीत अमृताताई आमच्यासोबत,मुख्यमंत्र्यांच्या दबावाचा प्रश्नच नाही-रामदास कदम

जेव्हा रेखा गर्भवती असल्याचं समजलं तेव्हा नक्कालालनं तिघांशीही लग्न करण्याचे ठरवलं. नातेवाईकांच्या उपस्थितीत गुरूवारी त्याने या तिघांशी एकाच मंडपात लग्नसुद्धा केलं.

First published: June 22, 2018, 10:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading