S M L

सरकारचं धोरणं शेतकऱ्याचं मरण ; 10 लाख टन तूर कोण खरेदी करणार ?

अजून 10 लाख टन तूर पडून असताना खरेदी मात्र थांबवली गेलीय. दुष्काळाने तापलेली जमीन पिकली आणि भरघोस पीक आलं. पण सरकारच्या धोरणानं मात्र तूर उत्पादकांचं वाटोळं झालंय

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2017 10:25 PM IST

सरकारचं धोरणं शेतकऱ्याचं मरण ; 10 लाख टन तूर कोण खरेदी करणार ?

24 एप्रिल : शेतकऱ्याच्या तुरीचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत नाफेडची केंद्र सुरु राहतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनीही केलीय. पण अजून 10 लाख टन तूर पडून असताना खरेदी मात्र थांबवली गेलीय. दुष्काळाने तापलेली जमीन पिकली आणि भरघोस पीक आलं. पण सरकारच्या धोरणानं मात्र तूर उत्पादकांचं वाटोळं झालंय.

१० लाख टन तूर पडलेली असताना आयात मुल्य वाढवण्याची बुद्धी सरकारला आज सुचलीय. मुख्यमंत्र्यांनी तुरडाळीवर दिल्लीत भेटीगाठी घेतल्या. त्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवानही होते. त्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी तुर उत्पादकांसाठी दिर्घकालीन योजना गरजेचं असल्याचं म्हटलंय. प्रश्न असा आहे की देशात सर्वाधिक तूर उत्पादन करणाऱ्या राज्यात महाराष्ट्र अव्वल आहे. मग त्यांच्यासाठी एवढ्या उशीरा सरकारला जाग का आलीय?

तीन वर्षांच्या सलग दुष्काळानंतर जमीन चांगली पिकली. गेल्या वर्षी तूर प्रती क्विंटल १० हजाराच्या घरात होती. तूर उत्पादक शेतकऱ्यांना बरे दिवस होते. खुल्या बाजारात तर किलोला २०० रूपये मोजावे लागत होते. गरीबांच्या ताटातून वरण गायब झालं.  शेतकऱ्यांना वाटलं यंदा लॉटरी लागेल. पण झालं उलटंच. केंद्र सरकारनं तूर आयात केली. देशातले तुरीचे भाव पडले. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भरघोस तूर पिकवलीय. तेव्हा सरकारचं धोरण शेतकऱ्यांचं मरण ठरतंय.भारत हा जगातला सर्वात मोठा तूर उत्पादक आणि ग्राहक देश आहे. रोज जवळपास ७ हजार टन डाळ खाण्यासाठी वापरली जाते. देशाची भूक हा शेतकरी भागवतोय. पण त्याच्यासाठीच सरकारकडे नियोजन नसल्याचं उघड झालंय.

पेट्रोल खुलं करण्यात आलंय. त्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार ठरतात. शेतकऱ्यांचा शेतीमालही सरकारी जोखडातून मुक्त व्हायला हवा. सरकारनं शेतीमालाचे भाव पाडण्याचं धोरण बदललं नाही तर शेतकऱ्यांचं मरण थांबणार नाही...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 10:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close