मुलींप्रमाणे 'याला'ही येते मासिक पाळी

मुलींप्रमाणे 'याला'ही येते मासिक पाळी

हो आता हे वाचायला आणि ऐकायला थोडं वेगळं वाटतं पण कॅसला मुलींप्रमाणे प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येते. कॅस क्लेमर आता समलैंगिक आहे.

  • Share this:

10 डिसेंबर : वॉशिंगटनमध्ये राहणारा कॅस क्लेमर  हा पंधरा वर्षांचा होता. त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणेच तोही खेळायचा, बागडायचा. त्यामुळे त्याच्याकडे फार कोणी लक्ष दिलं नाही पण एक दिवस अचानक त्याला मासिक पाळी आली आणि त्याची ओळखच बदलली. हो आता हे वाचायला आणि ऐकायला थोडं वेगळं वाटतं पण कॅसला मुलींप्रमाणे प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येते. कॅस क्लेमर आता समलैंगिक आहे.

त्याच्या या लैंगिक बदलामुळे त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. कारण कॅस म्हणायचा की, 'त्याला त्याच्या शरीराने धोका दिला होता. प्रत्येक महिन्याचे पाच दिवस त्याची ओळख बदलायची. जेव्हा मला मासिक पाळी येते तेव्हा मी नव्याने ते पाच दिवस जगतो. मी धड मुलगी ही नाही आणि मुलगाही नसल्याने मी खूप रडायचो.' पण या सगळ्याला खचून न जाता कॅस आता धैर्याने समलैंगिकांविषयी जनजागृतीचं काम करत आहे. तो आता एक 'पीरियड अॅक्टिविस्ट' आहे. खरंतर हा मुद्दा असा होता की कॅस या विषयी कोणाशीही मोकळेपणाने बोलू शकत नव्हता पण आता तो त्याच्यासारख्या समलैंगिकांसाठी लढत आहे. त्याने 'द अॅडव्हेनचर्स ऑफ टोनी द टॅम्पॉन' हे पुस्तकही लिहिलं आहे. त्याच्या पुस्तकावरून त्याने सोशल मीडियावर मोठी जनजागृतीही केली.

 

'द अॅडव्हेनचर्स ऑफ टोनी द टॅम्पॉन' हे पुस्तक

'द अॅडव्हेनचर्स ऑफ टोनी द टॅम्पॉन' हे पुस्तक

मासिक पाळी ही फक्त महिलांनाच नाही तर काही समलैंगिकांनाही येते पण त्यांच्या समस्या जरा गंभीरच आहेत.

- एकतर त्यांचा हा त्रास ते कोणाशीही बोलू शकत नाहीत.

- समलैंगिकांसाठी सुरक्षित असे सॅनिटरी पॅड्सही नाहीत.

- ते घराबाहेर असतील तर ते महिलांच्या शौचालयात जाऊ शकत नाही. कारण यात महिला घाबरतात आणि आम्हालाही मासिक पाळी येते हे त्यांना समजवणंही कठीणच असतं.

- महिलांच्या सोयीनुसार बनवलेल्या सॅनिटरी पॅड्स वापरण्यात समलैंगिकांना त्रास होतो.

- पुरुषांच्या शौचालयात कचऱ्याचे डब्बे फार कमी प्रमाणात असतात त्यामुळे त्याचाही त्रास यांना सहन करावा लागतो.

या सगळ्या समस्यांवर जनजागृती आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काही हालचाली होणं महत्त्वाचं आहे.

या सगळ्या समस्यांवर कॅसने फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टला इतर सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आणि यावर लोकांनी मोकळेपणाने बोलण्यास सुरूवात केली आहे. कॅसने त्याला होणाऱ्या त्रासाचा आणि त्याच्यात झालेल्या या बदलाचा स्वीकार केलाय आणि इतरांनाही त्यासाठी तो प्रोस्ताहित करत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे देशभरातून अनेक लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत. त्याच्या या धैर्याचं अभिनंदन.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 07:00 PM IST

ताज्या बातम्या