नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना तीन दिवसांत तीन गुंडांची हत्या

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना तीन दिवसांत तीन गुंडांची हत्या

नागपुरात भररस्त्यात मुडदे पडत असताना मुख्यमंत्री मात्र नागपुरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करतायत.

  • Share this:

19 डिसेंबर : नागपुरात विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना टोळी युद्धाचा भडका उडालाय. नागपुरात गेल्या तीन दिवसांत तीन गुंडांच्या हत्या झाल्यात. तरीही नागपुरात गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.

नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. 366 आमदार आणि मंत्री नागपुरात आहेत. नागपूरची पोलीस छावणी झालीये. एवढं सगळं असतानाही नागपुरात टोळीयुद्ध भडकलंय. गेल्या तीन दिवसांत नागपुरात टोळीयुद्धातून तीन गुंडांच्या हत्या झाल्यात. शनिवारी खापरखेड्याला गुंड आकाश पाणपत्तेचा खून झाला. कोळसा माफियांच्या संघर्षातून ही घटना घडली. या घटनेच्या फक्त दोन दिवसानंतर पुन्हा खरबी रोड परिसरात संजय बनोदे आणि बादल शांभकर या दोन गुंडांची हत्या झाली. ही हत्याही टोळीच्या वर्चस्ववादातून झाल्याचं सांगण्यात येतंय.

नागपुरात भररस्त्यात मुडदे पडत असताना मुख्यमंत्री मात्र नागपुरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करतायत.

खून, खंडणी बलात्कार या घटना नागपूरकरांसाठी नित्याच्या झाल्यात. अशा अवस्थेत सामान्य नागपूरकराला असुरक्षित वाटू लागलंय. असं असतानाही नागपुरात गुन्हेगारी कमी झालीय हे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं हास्यास्पद वाटतंय.

First published: December 19, 2017, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading