पवारांच्या बारामतीत 35 दिवसांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पवारांच्या बारामतीत 35 दिवसांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बारामती म्हटलं तर सधन शेतकऱ्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं पण वस्तूस्थिती तशी नाहीये. बारामतीत गेल्या 35 दिवसांत 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.

  • Share this:

09 जून : बारामती म्हटलं तर सधन शेतकऱ्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं पण वस्तूस्थिती तशी नाहीये. बारामतीत गेल्या 35 दिवसांत 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.

शेतकरी आत्महत्यांचं लोण आता शरद पवारांच्या बारामती तालुक्यातही पोहचलंय. गेल्या पस्तीस दिवसांत बारामती तालुक्यातल्या तीन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलीये. नुकताच बारामतीजवळच्या भोंडवेवाडीतील हनुमंत शिंदे यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या डोक्यावर 79 हजारांचं कर्ज होतं. शेतात बांधलेली बैलजोडी अचानक दगावली. आईच्या सततच्या आजारपणामुळे तणावात असलेल्या हनुमंत शिंदेंनी आपली जीवनयात्रा संपवली.

बारामतीच्या जिरायती पट्ट्यात झालेल्या तीन आत्महत्या शेतकरी किती वाईट परिस्थितीत आहे हे सांगण्यासाठी बोलक्या आहेत.

यापूर्वी शिर्सूफळ इथं काशीनाथ हिवरकर यांनी आत्महत्या केली. त्यानंतर खोपवाडी-दंडवाडीतील सुखदेव चांदगुडे यांनी आत्महत्या केली. तर त्यानंतर आता भोंडवेवाडीतील हनुमंत शिंदे यांनी आत्महत्या केलीय.

पहिल्यांदा विदर्भ, त्यानंतर मराठवाडा आणि आता सधन अशा पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं लोण आल्यानं सरकारनं वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीये.

First published: June 9, 2017, 10:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading