धक्कादायक !, २०१७ च्या पहिल्या ६ महिन्यात राज्यातून २९३५ मुली बेपत्ता

धक्कादायक !, २०१७ च्या पहिल्या ६ महिन्यात राज्यातून २९३५ मुली बेपत्ता

२०१७ च्या जानेवारीपासून ३० जूनपर्यंत सहा महिन्यात राज्यातून एकूण २९६५ मुली बेपत्ता झाल्याची माहिती खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • Share this:

19 डिसेंबर : महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. कारण २०१७ च्या जानेवारी पासून ३० जूनपर्यंत सहा महिन्यात राज्यातून एकूण २९६५ मुली बेपत्ता  झाल्याची माहिती  खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्यातील सत्तारूढ भारतीय जनता पार्टीचे आमदार रणधीर सावरकर यांनी  राज्यसभेत पत्र  लिहून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, २०१६ मध्ये सुरवातीच्या ६महिन्यात २८८१ मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि यावर्षी हा आकडा  वाढून २९६५ एवढा झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, या संबंधी कोणत्या ही टोळी विरोधात कारवाई केली गेली नाहीये. राज्यातील  १२ पोलीस विभागांना अश्या घडामोडी विरोधात तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने बेपत्ता झालेल्या मुलींचा  शोध लावण्यासाठी www.trackthemissingchild.gov.in  ही वेबसाईट बनवण्यात आली आहे.

त्यासोबतच रेल्वेने पण आपल्या पोर्टल www.shodh.gov.in   ला आधुनिक बनवलं आहे. ह्या वेबसाईट शोध लावण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारने ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन स्माईल यासारख्या ४ अभियान सुरु करण्यात आल्या आहेत. याच माध्यमाद्वारे २०१६ मध्ये १६१३  तर या वर्षी ६४५ मुली शोधून काढण्यासाठी मदत झाली आहे.  परंतु मुलींचा बेपत्ता होण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चाललंय हेच खरंय.

First published: December 19, 2017, 9:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading