दहशतवादी फैजल मिर्झाला नेत्यांच्या सभेत करायचा होता घातपात !

दहशतवादी फैजल मिर्झाला नेत्यांच्या सभेत करायचा होता घातपात !

फैजलच्या अटकेमुळे फक्त मुंबईच नव्हे तर देशावरचं मोठं संकट टळलंय. मात्र यापुढे देखील देशातल्या तपास यंत्रणांना असच सजग राहून कारवाया कराव्या लागणार आहेत. कारण मुंबईसाठी रात्र वैऱ्याची आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मे : मुंबईतून अटक करण्यात आलेला दहशतवादी फैजल मिर्झाच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आलीय. घातपात घडवण्यासाठी फैजल पाकिस्तानमधून आदेशाची वाट पाहता होता. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही महत्त्वाची राज्य त्याच्या टार्गेटवर होती हे देखील आता उघड झालंय. तसंच दहशतवाद्याच्या हिटलिस्टवर देशातले दोन मोठे नेते होते.

नाव : फैजल मिर्झा

जन्म तारीख : 16 डिसेंबर 1985

पत्ता : रूम नं-9/सी, मशिद चाळ, बहिराम बाग, जोगेश्वरी, मुंबई

26/11 पेक्षा मोठा हल्ला करण्यासाठी फैजलनं मुंबई गाठली.मात्र घातपाताचा कट तडीस नेण्यापूर्वीच तपासयंत्रणांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात.

पाकिस्तानात जाण्यासाठी फैजलनं मुंबई सोडली तेव्हापासून मुंबई पोलीस, कोलकाता पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसला त्याच्यासंदर्भात कुणकुण लागली होती. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आहे अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. फैजल पुन्हा मुंबईत परतताच एटीएसच्या पथकानं त्याला 11 मे रोजी जोगेश्वरीमधून अटक केली.

फैजल हा 'डी' कंपनी, इंडियन मुजाहिद्दीन, आयएसआयचा हस्तक असल्याचं समजतंय.

दाऊदच्या डी कंपनीच्या मदतीनं त्यानं शारजा-दुबई-पाकिस्तान असा प्रवास केला. दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचं त्यानं पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलं.

मुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा त्याचा डाव होता. सणासुदीच्या काळात मोठा घातपात घडवण्याचा कटही त्यानं आखल्याचं चौकशीदरम्यान उघड झालं. महत्त्वाच्या गणपती मंडळांना निशाणा करण्याच्या इराद्यानं त्यानं टेहळणी देखील केली.

मोठ्या नेत्यांच्या सभेदरम्यान हल्ला करण्याची योजना त्यानं आखली होती. दहशतवादी प्रशिक्षणासाठी भारतातून तरूण पाठवण्याची जबाबदारी दहशतवादी संघटनांनी त्याच्यावर सोपवली होती.

अलिकडेच सरकारनं दाऊदच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरूवात केलीय. डी कंपनीची दुबईतली संपत्ती जप्त करण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी तिथल्या सरकारशी बोलणी केली आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारनं त्याच्या मुंबईतल्या संपत्तीवरही टाच आणलीय. या सगळ्यांचा सूड उगवण्यासाठी डी कंपनी फैजलच्या पाठीशी तर उभी राहिली नाही ना? अशी शंका आता उपस्थित केली जातेय.

घरच्यांना कोणतीच ठोस माहिती न देता फैजल दुबईला जाऊन आल्याचं त्याच्या भावानं सांगितलंय. त्यामुळे फैजलभोवतीचं संशयाचं वर्तुळ आणखीनच गडद झालंय.

फैजलच्या अटकेमुळे फक्त मुंबईच नव्हे तर देशावरचं मोठं संकट टळलंय. मात्र यापुढे देखील देशातल्या तपास यंत्रणांना असच सजग राहून कारवाया कराव्या लागणार आहेत. कारण मुंबईसाठी रात्र वैऱ्याची आहे.

First published: May 14, 2018, 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading