मीरा-भाईंदरमध्ये 'ही' आहे शिवसेनेच्या पराभवाची कारणं

मीरा-भाईंदरमध्ये 'ही' आहे शिवसेनेच्या पराभवाची कारणं

मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेच्या पराभवाची कारणं अनेक आहेत. सुरुवातीलाच युती करावी की नाही यावरून शिवसेनेत दुफळी पडली होती.

  • Share this:

21 आॅगस्ट : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतला विजय हा भाजपसाठी खास असाच आहे. पनवेलनंतर मिरा भाईंदरमध्ये मोठा विजय नोंदवून भाजपनं शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.

एकच जल्लोष आहे मिरा-भाईंदर महापालिकेच्या विजयाचा...भाजपला स्वतः जिंकण्याच्या आनंदापेक्षा शिवसेनेची कशी जिरवली, हे सांगण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनाच जिंकेल असा दावा केला जात होता. पण भाजपनं रणनिती आणि योग्य नियोजनाच्या जोरावर ऐतिहासिक विजय मिळवला. विजयानंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. त्यांनीही थेट दिल्लीतून या विजयाबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेच्या पराभवाची कारणं अनेक आहेत. सुरुवातीलाच युती करावी की नाही यावरून शिवसेनेत दुफळी पडली होती.  अनिल देसाई, संजय राऊत, सुभाष देसाई आणि रामदास कदमांना युती नको होती. तर एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, गजानन कीर्तीकर, मिलिंद नार्वेकरांना युती हवी होती.

शेवटी प्रताप सरनाईक आणि गिल्बर्ट मेन्डोसांवर उद्धव ठाकरेंनी राजकीय डाव खेळून पाहिला. पण त्यातही शिवसेनेचा मुखभंग झाला. पराभवानंतर शिवसेनेनंही खास त्यांच्या शैलीत भाजपला उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.

पराभवाची कारणं शिवसेना काहीही देत असली तरी पराभव हा पराभव आहे. आणि तो शिवसेनेनं स्वीकारायलाच हवा. भाजपनं मुंबईच्या वेशींवरच्या शहरांवरील आपलं वाढतं वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दाखवलंय.

यांचा युतीला विरोध होता

अनिल देसाई संजय राऊत सुभाष देसाई रामदास कदम

यांना हवी होती युती

एकनाथ शिंदे  दिवाकर रावते गजानन कीर्तीकर मिलिंद नार्वेकर

First published: August 22, 2017, 12:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading