फडणवीस सरकारचा 'अतिरिक्त'पणा, कर्जमाफीचा निधी पेट्रोल-डिझेलमधून करणार वसूल

.जीएसटी लागू झाल्यानंतर उद्यापासून मुंबईतील जकात बंद होणार आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईसह राज्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणं अपेक्षित आहे. मात्र...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2017 08:21 PM IST

फडणवीस सरकारचा 'अतिरिक्त'पणा, कर्जमाफीचा निधी पेट्रोल-डिझेलमधून करणार वसूल

30 जून : उद्या 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे.जीएसटी लागू झाल्यानंतर उद्यापासून मुंबईतील जकात बंद होणार आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईसह राज्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणं अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकार हा जकात कर राज्य अतिरिक्त करा अंतर्गत वळता करून घेणार असल्याने राज्यात इंधनाचे दर जैसे थै राहणार आहेत.

बॉम्बे रिफायनरीमध्ये कच्या इंधनावर प्रक्रिया होऊन मुंबईसह महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल वितरित होते. मुंबईत पेट्रोलवर 3.50 रुपये प्रति लिटर तर डिझेलवर प्रत्येकी 2.50 रुपये प्रति लिटर जकात आकारली जाते. उद्या 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईतील जकात रद्द होणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आपोआपच कमी होण अपेक्षित आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमाफी योजनेसाठी पैसे उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार कमी होणारा जकात कर "अतिरिक्त राज्य कराच्या"अंतर्गत वळता करून घेण्याचा विचारात आहे. त्यामुळेच मुंबईसह राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईत जकात रद्द होणार आहे.

सध्या मुंबईतील जकात कर

पेट्रोल - 3.50 रुपये प्रति लिटर

Loading...

डिझेल - 2.50 रुपये प्रति लिटर

मुंबईत "बॉम्बे हाय रिफायनरी" येथे कच्या इंधनावर प्रक्रिया होऊन उर्वरित महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल वितरित होते. त्यामुळे मुंबईतील जकात कराचा भुर्दंड चांदा ते बांदा पर्यंत सर्व नागरिकांना होतो.

जीएसटी लागू झाल्यानंतर जकात कर कायमचा रद्द होणार असल्याने राज्यातील जनतेला पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळणे अपेक्षित, मात्र प्रत्यक्षात असं नाही. रद्द झालेला जकात कर राज्य सरकार "अतिरिक्त राज्य कर " च्या अंतर्गत वळता करून घेणार आहे.

दरम्यान, रद्द झालेला जकात कर दुसऱ्या करा अंतर्गत वळता करून घेणं ही राज्यातील जनतेची फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलाय.

एकूणच निधी उभारणीसाठीं पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलवरील कर वाढविण्याचा सोपा मार्ग राज्य सरकारने स्वीकारला आहे. पण यामुळे इंधनासाठी देशातील सर्वाधिक महागडं राज्य अशी बिरुदावली महाराष्ट्राला मिळतेय, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...