S M L

हॉस्पिटलला टाळं ठोकल्यानं महिलेची उकिरड्यावर प्रसुती

डॉक्टर नाहीत म्हणून हॉस्पिटलला टाळं ठोकलेलं. अशा अवस्थेत प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेची प्रसुती हॉस्पिटलजवळच्या उकिरड्यावर झालीये

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2017 09:43 PM IST

हॉस्पिटलला टाळं ठोकल्यानं महिलेची उकिरड्यावर प्रसुती

प्रफुल्ल खंदारे, बुलडाणा

06 जून : हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीत. कळस म्हणजे डॉक्टर नाहीत म्हणून हॉस्पिटलला टाळं ठोकलेलं. अशा अवस्थेत प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेची प्रसुती हॉस्पिटलजवळच्या उकिरड्यावर झालीये. ही घटना घडलीये बुलडाणा जिल्ह्यातल्या वरवट बकाल गावात...

जिल्ह्यातल्या संग्रामपूर वरवट बकाल या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आलाय. हॉस्पिटलच्या गेटला टाळं ठोकल्यानं एका महिलेची हॉस्पिटलबाहेरच प्रसुती करावी लागली. संगीता गुजराती ही आदिवासी महिला प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसल्यानं कर्मचाऱ्यांनी गेटला टाळं ठोकलं होतं. कहर म्हणजे कुलूपाची चावीच कुणाकडे नव्हती.

प्रसुतीवेदना होत असतानाही तब्बल दोन तास संगीता गेटजवळ बसल्या शेवटी हॉस्पिटल काहीच करत नाही म्हटल्यावर नाईलाजानं संगीता यांच्या सासूनं हॉस्पिटलच्या बाजुला असलेल्या उकिरड्यावरच तिची प्रसुती केली.

एवढी धक्कादायक घटना घडूनही बुलडाण्याचा आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करणारी आरोग्य यंत्रणा कधी लोकाभिमूख होणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 09:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close