S M L

हेच 'ते' ७० वर्षांचे चहावाले, ज्यांचा मोदींनी केला होता उल्लेख

शिर्डीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी नंदूरबारच्या चौधरी चहावाल्याचा उल्लेख केल्याने ते रातोरात लोकप्रिय झालेत

Updated On: Oct 23, 2018 08:04 PM IST

हेच 'ते' ७० वर्षांचे चहावाले, ज्यांचा मोदींनी केला होता उल्लेख

निलेश पवार,प्रतिनिधी

नंदुरबार, २३ आॅक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उल्लेखानंतर नंदुरबारमधील चौधरी चहावाले चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. मात्र पोटाच्या दोन वेळची खळगी भरण्यासाठी आजही हे रामदास चौधरी वयाच्या सत्तराव्या वर्षी घरुन चहा बनवून रोज भल्या पहाटेच्या रेल्वेत प्रवास करुन विकत आहे.शिर्डीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी नंदूरबारच्या चौधरी चहावाल्याचा उल्लेख केल्याने ते रातोरात लोकप्रिय झालेत. वयाच्या सत्तरीतही आपल्या धारदार मिशांवर ताव देणारे चौधरीचाचा आजही भल्या पहाटे उठतात आणि चहा बनवतात आणि नंदूरबार स्टेशनवर जाऊन प्रवाशांना वाफाळलेला गरमागरम चहा पाजतात.रेल्वे प्रवासादरम्यान मोदींना चहा पाजल्याची आठवणही ते आवर्जून सांगतात.

मोदींनी उल्लेख केल्याने चहावाले चौधरी प्रकाशझोतात आले असले तरी त्यांचं जीवनमान मात्र आजही हलाखीचेच आहे. नंदुरबार मधल्या मध्यवस्तीतील अतिशय रुंद अशा घरात ते राहतात, तिथंच चहा बनवतात आणि भल्या पहाटे सुरतकडे जाणाऱ्या हावडा एक्स्प्रेसमध्ये जाऊन चहाची विक्री करतात.

गेली 40 वर्षे त्यांचा हाच नित्यक्रम सुरू आहे. पण अजूनही रेल्वेनं त्यांना साधा चहा विक्रीचा परवानाही दिलेला नाही. मोदींनी कौतुक केलंच आहे तर आम्हाला चहा विक्रीचा अधिकृत परवाना तरी मिळावा, किंवा स्टेशनवर स्टॉल तरी मिळावा. एवढीच चौधरी कुटुंबियांची माफक अपेक्षा आहे.

Loading...
Loading...

चौधरीचाचा यांची दुसरी पिढी देखील चहा विक्रीचाच व्यवसाय करते. पण आजही त्यांना रेल्वे प्रशासनाच्या रोषाला सामोरे जावे लागते. अनधिकृत फेरीवालेही त्यांच्यावर केसेसही दाखल आहेत. प्रसंगी हप्तेही द्यावे लागतात. हेच रेल्वे स्टेशनवरील तमाम चहावाल्याचं खरं दुखणं आहे.

============================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2018 08:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close