'बस्स झालं कर्जमाफीचं राजकारण,आता आम्हाला पेरणी करू द्या'

'बस्स झालं कर्जमाफीचं राजकारण,आता आम्हाला पेरणी करू द्या'

सरकारनं कर्जमाफी केली...पण तरीही त्यावरून होणारं राजकारण काही अजून थांबलं नाहीय. पाऊस पडल्यामुळे शेतकरी मात्र पेरणीकडे वळलाय.

  • Share this:

27 जून : सरकारनं कर्जमाफी केली...पण तरीही त्यावरून होणारं राजकारण काही अजून थांबलं नाहीय. पाऊस पडल्यामुळे शेतकरी मात्र पेरणीकडे वळलाय. शेतकऱ्याच्या नावावर होणाऱ्या राजकारणावर शेतकरी काय म्हणतोय, पाहुया याबद्दलचा हा रिपोर्ट...

एकीकडे शेतकरी संप, कर्जमाफी याचं राजकारण सुरू असताना आमचा भोळाभाबडा शेतकरी मृगाचा पाऊस वेळेवर सुरू होणार का याच्या चिंतेत पावसाची वाट बघत होता पेरणीसाठी...शेतकरी सध्या पेरण्या करण्यात व्यस्त आहे. पण त्याच्या शेतीत त्याला काय हवंय याचा विचार न करता काहीजण त्याला राजकारणात ओढू पाहताहेत.

सरकारनं कर्जमाफी जाहीर केली, तरीही काहीगट अजून शेतकऱ्यांचा कैवार घेऊन पुन्हा सरकारदरबारी आणि विरोधकांकडे हेलपाटे  मारण्याचं काम करताहेत. पण आता पाऊस सुरु झालाय, सगळीकडे पेरणीची लगबग आहे. ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी करावं असं म्हणत आमचा शेतकरी पेरणीकडे वळलाय. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या खऱ्या प्रश्नाकडे कुणाचंच लक्ष नाही, प्रत्येकाला केवळ राजकारणच करायचं आहे. यावर शेतकरी बघा काय म्हणतोय.

कर्जमाफीचं राजकारण आता पुरे झालं. सगळीकडे पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना त्यांचं शेतीचं काम करू द्या...राजकारण करण्यापेक्षा आमच्या बळीराजाला आणखी कोणती मदत करून, त्याच्या दुष्टचक्रातून बाहेर काढता येईल, याचा विचार करा...शेतकऱ्याला मदतीपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या आधाराची गरज आहे...तो आधार कधी मिळणार याचं तरी भान ठेवा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 09:29 PM IST

ताज्या बातम्या