मत्स्यशेती करणाऱ्या तळोजाच्या शेतकऱ्याची यशोगाथा

मत्स्यशेती करणाऱ्या तळोजाच्या शेतकऱ्याची यशोगाथा

  • Share this:

सिद्धेश म्हात्रे, तळोजा

05 एप्रिल : किराणामालाचा व्यवसाय सोडून पनवेल तालुक्यातील तळोजाचे शेतकरी नामदेव पाटील यांनी मत्स्यशेती करण्याचा निर्णय घेतला..आज एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांना ओळखलं जातंय.

वळप गावातले नामदेव पाटील यांचे 15 वर्षांपूर्वी किराणा मालाचे दुकान होते. पण त्यात त्यांना रस नव्हता. म्हणून त्यांनी मत्स्यशेतीचा कोर्स केला..आणि गावातलं एक तळं भाड्यानं घेऊन मत्स्यशेती सुरू केली. सुरुवातीला तीन प्रकारचे मासे असलेली शेती आता 15 प्रकारच्या माशांपर्यंत पोहोचलीय. गोड्या पाण्यातील पापलेट, जिताडा, मोठी कोलंबी, काळा मासा, यासारखे मासे इथे मिळतात..

नामदेव पाटील यांनी आपल्या मत्स्यशेतीत अनेक प्रयोग केलेत. तसंच ते हे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शनही करतात. वर्षभरात मासेविक्रीतनू त्यांना 16 लाखांचं उत्पन्न मिळतं...

माश्यांची चव चांगली असावी यासाठी त्यांना योग्य खुराक दिला जातो. यासाठी पाटील यांना फिशरी रिसर्च सेंटरकडून मार्गदर्शन मिळतं.

मत्स्यशेतीसारखा वेगळा मार्ग चोखाळून नामदेव पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवलाय. शेतकऱ्यांनी संकटांपुढे हार न मानता शेतीमध्ये प्रयोग करून ती कशी फायद्याची कशी करता येईल, हे पाटील यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

First published: April 5, 2017, 3:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading