थंड महाबळेश्वर बनतंय स्वच्छ, राबवलं जातंय स्वच्छता अभियान

थंड महाबळेश्वर बनतंय स्वच्छ, राबवलं जातंय स्वच्छता अभियान

स्वच्छतेचे अनोखे संदेश भिंती चित्रांद्वारे लाखो पर्यटकांना दिले जातायत. यामुळे सुंदर असलेलं महाबळेश्वर आता स्वच्छ देखील झाल्याने पर्यटक जाम खूश आहेत.

  • Share this:

तुषार तपासे, महाबळेश्वर, 02 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये स्वच्छतेसाठी आता भिंतीदेखील बोलू लागल्या आहेत. स्वच्छतेचे  अनोखे  संदेश भिंती चित्रांद्वारे लाखो पर्यटकांना दिले जातायत. यामुळे सुंदर असलेलं महाबळेश्वर आता स्वच्छ देखील झाल्याने पर्यटक जाम खूश आहेत.

समुद्रसपाटीपासून सुमारे ४७०० फुट उंचीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील थंडगार हवेचं ठिकाण. सह्याद्रीच्या याच पर्वतरांगा पाहण्यासाठी पर्यटकांची कायम गर्दी  असते.

होय, आपण बोलतोय ते महाबळेश्वर या पर्यटनस्थळाविषयी.इथलं वेण्णा लेक. जिथं बोटिंग आणि घोडे सवारीचा आनंद पर्यटक लुटत असतात आणि आत या पर्यटनस्थळाची ओळख नुसतं महाराष्ट्रातच नाही तर देशभरात थंड हवेच्या ठिकाणासोबत स्वच्छ पर्यटनस्थळं व्हावी यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेने कसून प्रयत्न सुरू केले आहेत.

महाबळेश्वरमध्ये प्रवेश केल्या केल्या पर्यटकांना आता स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या अनेक भिंती पहायला मिळतील. या भिंतींवर महाबळेश्वरमधील अनेक पर्यटन ठिकाणं  रेखाटण्यात आली आहेत. महाबळेश्वर नगरपालिका देशात पहिला नंबर पटकवण्यासाठी तिथल्या स्थानिक आणि पर्यटकांसह एकदम सज्ज झाली आहे.

दरवर्षी लाखो पर्यटक या थंड हवेच्या ठिकाणी येत असतात. मात्र त्यामुळे हजारो टन कचरा आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण व्हायचा. मात्र आता दररोजच्या स्वच्छतेमुळे महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटक यांच्यात जागरुकता निर्माण झाली आहे. मात्र ही स्वच्छता कायमस्वरूपी रहावी त्यादृष्टीनं अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे.

First published: February 2, 2018, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading