स्वाभिमानी शेतकरी संघटना देणार सरकारला सोडचिठ्ठी ?

स्वाभिमानी शेतकरी संघटना देणार सरकारला सोडचिठ्ठी ?

महायुतीचा घटकपक्ष असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडण्याच्या विचारात आहे. चळवळीतला पक्ष आता सत्तेची ऊब सोडून पुन्हा जनतेत जाण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

05 जून : महायुतीचा घटकपक्ष असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडण्याच्या विचारात आहे. चळवळीतला पक्ष आता सत्तेची ऊब सोडून पुन्हा जनतेत जाण्याच्या तयारीत आहे.

चळवळीतून जन्म झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा सत्तेत जीव घुसमटू लागलाय. त्यामुळे अवघ्या तीन वर्षातच सत्तेतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर राजू शेट्टी विचार करु लागलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे आंदोलन हे समीकरण होतं. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला त्यांनी हादरे दिले. पण जेव्हा सत्ता आली तेव्हा मात्र भाजप सरकारच्या धोरणांमुळे त्यांची कोंडी झाली. सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं. सदाभाऊ सत्तेत रमले पण राजू शेट्टींची घुसमट आणखीनंच वाढली. एकेकाळच्या सख्ख्या दोस्तावर कारवाई करण्याचा इशारा देण्याची वेळ राजू शेट्टींवर आली.

राजू शेट्टी तर आता भाजपशी असलेली युती तोडण्याच्या विचारात आहेत. यापुढे भाजपसोबत राहणार नसल्याच्या निर्णयापर्यंत ते आलेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीतून बाहेर पडली तर सरकारला काहीच धोका नाही. पण भाजप पश्चिम महाराष्ट्रातला काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधी एक चळवळ्या साथीदार नक्कीच गमावणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 06:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading