S M L
Football World Cup 2018

मुंबईकर सुनील देवधर त्रिपुरातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार !

सुनील देवधर यांचा जन्म मुंबईत झाला. लहानपणीपासून संघाच्या शिस्तीत वाढलेल्या देवधरांनी तब्बल 12 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणूनही देशाच्या विविध भागात काम केलं आहे.

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2018 05:34 PM IST

मुंबईकर सुनील देवधर त्रिपुरातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार !

03 मार्च : त्रिपुरात 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच कमळ उमललंय. 59 पैकी 36 जागा जिंकत भाजपची सत्ता आली आहे. भाजपच्या या विजयामध्ये सुनील देवधर यांचं महत्त्वाचं योगदान आहे.

कोण आहेत सुनील देवधर?

सुनील देवधर यांचा जन्म मुंबईत झाला. लहानपणीपासून संघाच्या शिस्तीत वाढलेल्या देवधरांनी तब्बल 12 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणूनही देशाच्या विविध भागात काम केलं आहे.

शिवाय, बंगाली भाषेसह इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभूत्व आहे. मेघालय, त्रिपुरा, नागालँडमधील खासी आणि गारो सारख्या स्थानिक जातींमधील लोकांत त्यांच्या चांगला जनसंपर्क आहे..

त्यांनी प्रचारासाठी स्थानिक भाषा शिकून घेतल्या आहेत. 2005 पासून ‘माय होम इंडिया’च्या नावानं एक स्वयंसेवी संस्थादेखील सुरु केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ईशान्य भारतातील नागरिकांना सर्वप्रकारची मदत केली जाते आणि याचाच फायदा भाजपला झाल्याचं म्हटलं जातं. अंधेरीमध्ये घर असलेल्या 52 वर्षीय देवधरांनी आता ईशान्य भारतालाच आपलं घर मानलं आहे.

सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक संघ स्वयंसेवकानं देशासाठी एक वर्ष द्यावं असं आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत देवधरांनी इशान्येकडील राज्यांत कामाला सुरूवात केली आणि पुढे अविवाहित राहून संपूर्ण आय़ुष्य तिथे काढण्याचं ठरवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2018 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close