पुढील 9 दिवसांत उन्हाचा पारा वाढणार, उद्यापासून 'नवताप'ला सुरूवात

याच नवतपाच्या काळात पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे या ९ दिवसांच्या काळात मनुष्य आणि प्राण्यांसोबतच पाण्याच्या साठ्यांनाही त्याच्या झळा पोहचणार आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 24, 2017 06:56 PM IST

पुढील 9 दिवसांत उन्हाचा पारा वाढणार, उद्यापासून 'नवताप'ला सुरूवात

प्रवीण मुधोळकर,नागपूर

24 मे : विदर्भात उन्हाळ्याच्या झळा वाढतच आहे आता उन्हाळ्याचे शेवटचे नऊ दिवस म्हणजेच नवताप सुरू होणार आहे. २५ मे पासून सुरू होणाऱ्या या नवतापमध्ये तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त राहणार आहे.

सुर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावर तापमानात तीव्रतेनं वाढ होते. याकाळातील वाढलेले तापमानामुळे चांगला पाऊसही पडण्यास मदत मिळते. उन्हाळ्याच्या शेवटच्या या काळाला नवताप असं म्हणतात. अस असलं तरी या तापमानामुळे नागरिकांना काही दिवस चटके सहन करावे लागणार आहे.

याच नवतापाच्या काळात पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे या ९ दिवसांच्या काळात मनुष्य आणि प्राण्यांसोबतच पाण्याच्या साठ्यांनाही त्याच्या झळा पोहचणार आहे. नवतपाच्या काळात विदर्भातील धरणांमधील पाण्याची पातळीही कमी होणार आहे.

या ९ दिवसांच्या काळामध्ये नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शक्यता उन्हात बाहेर पडू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.

Loading...

वातावरणातील बदलांमुळे जगभरात तापमान वाढीचे संकट उभं ठाकलं आहे. तर झाडांच्या कत्तलीमुळे आणि वाढत्या खाणींमुळे विदर्भातले तापमानही गेल्या काही वर्षात प्रचंड वाढले आहे. आता शेवटचे नऊ दिवस जरी विदर्भातील लोकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार असल्या तरी या काळात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2017 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...