सांगलीचा 'सचिन', मिरची उत्पादनातून कमावले 6 लाख !

सांगलीचा 'सचिन', मिरची उत्पादनातून कमावले 6 लाख !

या मिरचीतून 14 टनाचं उत्पादन घेत 6 लाखांचा फायदा त्याने मिळवला आहे.

  • Share this:

मिलिंद पोळ, सांगली

01 आॅगस्ट : सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या कवठे एकंद गावच्या सचिन जाधव या तरूण शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात मल्चिंग पेपरवरती सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीची लागवड केलीय. या मिरचीतून 14 टनाचं उत्पादन घेत 6 लाखांचा फायदा त्याने मिळवला आहे.

हा हिरवागार मिरचीचा फड पाहा...कवठे एकंद गावातल्या सचिन जाधव या तरूण शेतकऱ्याचं हे शेत...घरच्या 3 एकर शेतात ऊस आणि द्राक्षाची बाग, पण यात फायदा कमी आणि तोटा जास्त. म्हणून सचिनने पर्यायी पीक म्हणून सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीची एक एकर क्षेत्रावर बेडवर मल्चिंग पेपरद्वारे लागवड केली.

सचिनचा निर्णय योग्य ठरला. 75 व्या दिवशीच मिरचीचं उत्तम पीक आलं. या टपोऱ्या मिरचीला प्रती किलो 50 ते 55 रुपये भाव मिळतोय. 4 महिन्यात सचिनने 6 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलंय. त्याला यासाठी कृषी सल्लागार एस. सी. नरले यांचं मार्गदर्शन लाभलं.

मेहनत आणि योग्य निर्णय घेतल्यावर काय होऊ शकतं याचं सचिन जाधव हे उत्तम उदाहरण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 06:06 PM IST

ताज्या बातम्या