चेन्नई, 24 जून : तामिळनाडूच्या पॅट्रिसिया नारायणचं आयुष्य प्रेरणादायी आहे. पॅट्रिसियाचं आयुष्य खूप हालाखीत होतं. त्या फक्त जेवण करू शकत होत्या. म्हणून छोट्या ठेल्यावर त्यांनी सामोसे आणि ड्रिंक्स विकायला सुरुवात केली. आज त्या चेन्नईतल्या 14 रेस्टाॅरंट्सच्या मालकीण आहेत. फिक्कीनं त्यांनी वुमन आॅफ द इयरचा पुरस्कार दिला.
दोन मुलांच्या आई असलेल्या पॅट्रिसियाचे पती ड्रग अॅडिक्ट होते. काही कमवायचे नाहीत. त्यांना मारझोडही करायचे. त्यांचा प्रेमविवाह, तोही घरच्या लोकांच्या मनाविरुद्ध झालेला. त्यामुळे कुणाची मदत नाही.
परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांनी 1982 रोजी चेन्नईतल्या मरिना समुद्र किनारी एक ठेला सुरू केला. त्यावर काॅफी, चहा, सामोसे, ज्यूस विकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांची कमाई होती फक्त 50 पैसे. आणि तिथूनच सुरुवात झाली.
दरम्यान, त्यांच्या आयुष्यात एक वाईट गोष्ट घडली. त्यांची मुलगी संदीपा आणि जावई एका अपघातात मृत्यू पावले. या दोघांच्या नावावर त्यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली.
पॅट्रिसिया यांनी आपला मुलगा प्रवीणबरोबर रेस्टाॅरंटची चेनच सुरू केली. आणि नाव दिलं संदीपाचं. आज त्यांची 14 रेस्टाॅरंट्स आहेत आणि चेन्नईला मोठा बंगला. मनात आणलं तर नियतीलाही आव्हान देता येतं हेच पॅट्रीसियानं दाखवून दिलं.
हेही वाचा
हिंगोलीमध्ये स्त्रीरोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही, बाळंतिणी झोपल्या रस्त्यावर
वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या क्रूर नातवाला अटक
सौदी महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, दशकांपासूनची ड्रायव्हिंगवरची बंदी उठवली