29 जुलै : झोपु योजनेमध्ये बिल्डरांनी कसा भ्रष्टाचार केला याचा सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी पर्दाफाश केला. भर पत्रकार परिषदेत त्यांनी लाच दिलेले 500 आणि 2000 हजारांची बंडलंच समोर मांडली. एवढंच नाहीतर त्यांनी लाच मिळालेल्या 1 कोटीतून 60 लाख रुपये खर्चही केले. पण ते कुठे आणि कसे केले याचा खुलासा न दिल्यामुळे त्यांच्यावरच आता संशय निर्माण झालाय.
मुंबईतील झोपु योजनेमध्ये कसा भ्रष्टाचार आहे. बिल्डर आणि सरकारी अधिकाऱ्यांचे कसे लागेबांधे आहेत, याचं एक स्टिंग ऑपरेशन सामाजिक कार्यकर्ते संदीप येवलेंनी केलं होतं. आम्हीही ते दाखवलं होतं. पण आता येवलेंच्या वर्तनावरच सवाल उपस्थित झालेत. 60 लाख रुपये मी वकील आणि झेरॉक्सवर खर्च केलेत असा दावा येवले करत आहे.
एक कोटी रुपये पोलीस किंवा एसीबीकडे का दिले नाहीत, असा सवाल साधा उपस्थित होते. आमच्या बेधडक या कार्यक्रमात येवले म्हणाले होते, की त्यांचा पोलिसांवर विश्वासच नाही. मग प्रश्न असा उपस्थित होतो की पोलीस आणि एसीबी नाही, तर याचा तपास कुणी करावा असं त्यांना वाटतंय??, भ्रष्टाचाराविरोधातल्या लढ्यात येवले आपलं उखळ पांढरं करत नाहीयेत ना, या प्रश्नाला आता जागा आहे.
संदीप येवले म्हणतात,
"माझ्याकडे एवढी मोठी रक्कम असून मी अद्याप जमा केली नाही. यामुळे माझी चूक झाली. ही रक्कम येत्या सोमवारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जमा करणार आहे. या प्रकरणात विरोधकच अधिवेशनात आवाज उठवतात मात्र सत्ताधारी काहीच बोलत नाही. या प्रकरणात आमदार बच्चू कडू, प्रिती शर्मा आणि प्रकाश रेड्डी यांच्याशी चर्चाकरून कायदेशीर बाबी तापसून न्यायालयात जाणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री मदत निधीसाठी हा पैसा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. माझा स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्यामुळेच चाळीस लाख जमा केलेल नाहीत. स्थानिक पोलीस, बिल्डर आणि कही राजकारणी यांच्यामुळेच हे प्रकरण तडीस जाऊ नये अशी यांची इच्छा आहे. आता मी येत्या सोमवारी याबाबत एसबीच्या ऑफिसमध्ये जाणार आहे." -संदीप येवले
संबंधीत बातम्या
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा