News18 Lokmat

6 कोटींचा पूल कागदावरच !, गावकऱ्यांना करावा लागतो जीव मुठीत घेऊन प्रवास

आलेश्वर गावच्या गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नावेतून प्रवास करावा लागतोय. गावालगतच असणाऱ्या सीना नदीवर मागणी करून सुद्धा पूल होत नसल्यानं करमाळ्याला जाण्यासाठी गावकऱ्यांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2017 11:33 PM IST

6 कोटींचा पूल कागदावरच !, गावकऱ्यांना करावा लागतो जीव मुठीत घेऊन प्रवास

बालाजी निरफळ, उस्मानाबाद

 05 आॅगस्ट : लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आलेश्वर गावच्या गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नावेतून प्रवास करावा लागतोय. गावालगतच असणाऱ्या सीना नदीवर मागणी करून सुद्धा पूल होत नसल्यानं करमाळ्याला जाण्यासाठी गावकऱ्यांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय. विशेष म्हणजे 3 वर्षांपूर्वीच पुलासाठी 6 कोटी रुपयेही मंजूर केले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातलं आलेश्वर गाव...गावापासून परंडा शहर  40 किलोमीटर अंतरावर, उस्मानाबाद 120 किलोमीटर तर करमाळा अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. आपली दैनंदिन कामं करण्यासाठी करमाळा जवळचा असल्याने गावकरी करमाळ्याला जातात. पण हा प्रवास करत असताना गावकऱ्यांना सीना नदी लागते. या सीना नदीवर पूल नसल्यानं गावकरी.  शालेय विद्यार्थी, महिला, वयस्कर या सगळ्यांनाच जीव धोक्यात घालून नावेतून प्रवास करावा लागतोय.

गावकऱ्यांनी या मागणीला घेऊन लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत टेंडर काढून 6 कोटी रुपयांचा पूल मंजूर केला. या घटनेला तीन वर्ष उलटली. सगळं काही कागदावरच..

केवळ आलेश्वरच नाही बंगळवडी, डोंजा, गोषयीवाडी या गावकऱ्यांनाही इथूनच प्रवास करावा लागतोय. नदीच्या पलीकडे एसटी महमंडळाची बस येऊन थांबते आणि गावकरी या नावेत बसून नदी पार करतात. नंतर बसचा प्रवास...शासनाने लवकरात लवकर रस्ता करावा अशी मागणी आता गावकरी करतायत.

Loading...

या सगळ्या प्रकाराकडे पाहिलं तर विकासाच्या केवळ गप्पाच होतायत का असा प्रश्न निर्माण होता. आता तीन वर्षांनंतर तरी जाग येऊन आलेश्वरमधल्या गावकऱ्यांचा वनवास संपावा अशी अपेक्षा करूयात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 11:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...