गरजू रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत दोन घास अन्नसेवा!

केईएम आणि टाटा हॉस्पिटलच्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचा थोडा दिलासा दिलाय 'वुईथ आर्या' या एनजीओनं.

Sonali Deshpande | Updated On: Apr 13, 2018 01:46 PM IST

गरजू रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत दोन घास अन्नसेवा!

मुंबई, 13 एप्रिल : मुंबईत आजाराचा उपचार करायचं म्हटलं तरी लोकांना अडचण असते. रुग्णाच्या उपचाराचा खर्च, नातेवाईकांचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च. हा सगळा खर्च करता करता नातेवाईकांचा कस लागतो. पण केईएम आणि टाटा हॉस्पिटलच्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचा थोडा दिलासा दिलाय 'वुईथ आर्या' या एनजीओनं.

केईएम हॉस्पिटलच्या समोर रोज सकाळी 11.30 वाजता जेवणासाठी अशी लाईन लागते. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या पेशंटचे नातेवाईक इथं गर्दी करतात कारण त्यांना फक्त 10 रुपयांत पोटभर जेवण मिळतं. मुंबईतच राहणाऱ्या शीतल भाटकर रूग्णांच्या नातेवाईकांसाठी दोन घास हा उपक्रम राबवतात. या उपक्रमाअंतर्गत रोज सकाळी 100 आणि संध्याकाळी 150 लोकांना जेवण दिलं जातं. वुइथ आर्या या त्यांच्या एनजीओ मार्फत हा उपक्रम राबवला जातो.

रुग्णांच्या उपचारात नातेवाईकांचा पैसा खर्च होत असतो, त्यामुळं जेवणावरचा तरी त्यांचा खर्च वाचावा यासाठी सकाळी दहा रुपयांत आणि रात्री 5 रुपयांत हे जेवण दिलं जातं.

रुग्णांच्या नातेवाईकांना घरगुती जेवण तेही माफक किमतीत मिळतं. त्यामुळं अन्नदाता सुखी भवं असं म्हणत तेही शीतल यांना आशीर्वाद देतात.

दीड वर्षापूर्वी 50 जणांच्या जेवणापासून सुरुवात करत आता  250 लोकांचा टप्पा शीतलनं गाठलाय. यापुढे आणखी लोकांना जेवण देण्याचा त्या प्रयत्न करतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 01:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close