मी दादर स्टेशन बोलतोय !

मी दादर स्टेशन बोलतोय !

स्वच्छ स्टेशन सर्व्हे 2016 ला ज्या दादरला 102 क्रमांक दिला गेला होता तो यावर्षी थेट 330 वर घसरला. इथं इतकी अस्वच्छता का आहे. का सतत गजबजलेल्या दादरची ओळख स्वच्छ स्टेशन होऊ शकत नाही. जर दादर स्टेशन बोलायला लागलं तर ते कसं आपली व्यथा मांडेल. काय काय सांगेल आणि आपल्या या अवस्थेला कुणाकुणाला दोषी मानेल. आयबीएन लोकमतचा हा खास रिपोर्ट 'आत्मकथा दादर रेल्वे स्टेशनची'

  • Share this:

20 मे : दादर स्टेशन... देशातल्या 50 कोटींहुनही अधिक कमाई करुन देणाऱ्या स्टेशनपैकी एक...पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांपैकी एक दादर स्टेशन...मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अगदीच पिछाडीवर आहे. स्वच्छ स्टेशन सर्व्हे 2016 ला ज्या दादरला 102  क्रमांक दिला गेला होता तो यावर्षी थेट 330 वर घसरला. इथं इतकी अस्वच्छता का आहे. का सतत गजबजलेल्या दादरची ओळख स्वच्छ स्टेशन होऊ शकत नाही. जर दादर स्टेशन बोलायला लागलं तर ते कसं आपली व्यथा मांडेल. काय काय सांगेल आणि आपल्या या अवस्थेला कुणाकुणाला दोषी मानेल.  आयबीएन लोकमतचा हा खास रिपोर्ट 'आत्मकथा दादर रेल्वे स्टेशनची'

मी दादर बोलतोय...हो हो मी दादर.. तुमच्या सगळ्याचं शॉपिंग डेस्टिनेशन, हँगाउट पॉईंट आणि बरंच काही... रोज लाखो प्रवासी माझ्या उरावरुन धावत धावत जात असतात..कधी कधी मला भिती वाटते की, या गर्दीत भराभरा चालणाऱ्या लोकांना काही होणार नाही.. पण माझ्यावरुन चालणारा रेल्वे प्रवासी आता सरावलाय. हो सरावलाय.. तो सगळं सवयीनं करतो.. रोजच्या रोज दिसणाऱ्या मुंबईकरांबरोबर अनेक वेगवेगळे चेहरेही मला बघायला मिळतात. वेवगेळ्या मातींचा सुंगंध घेऊन येणारी मेल एक्स्प्रेस धडधडत येते ना तेव्हा मला आनंद होतो. कारण या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या मनानं मोठ्या असणाऱ्या मुंबईचं मी एक अविभाज्य भाग आहे. पण मला तुम्ही तुमच्यातलं मानता का???? कृपया खरं खरं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या... नाही ना.. हेच उत्तर आहे ना....मला माहीतंच होतं.. अहो नाहीतर मला तुम्ही घाणं केलं असतं का... हो माझा तुमच्यावरच आरोप आहे की मला तुम्ही घाण केलंय...मला तुम्ही कधी आपलं मानलंच नाहीत हो...

आता बघा...इतकं रुबाबानं म्हणणारा हा इसम आपल्या घरी असा कुठेही थुंकेल का.. अहो कुणीच नाही.. हेच पहा.. हा पादचारी पुल.. धडधडत येणाऱ्या लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांना चालता यावा म्हणून हा बांधला गेला. पण आता या माझ्या अंगावर बसलाय तो फेरीवाला...अहो आताही या फेरीवाल्यांना उठवायचं हे नाटक चाललंय बघा... रेल्वे पोलिसानी आपलं रोजचं काम प्रामाणिकपणे केलं तर ही अशी घाण होईल का... पण सगळंच साटंलोटं....

इथला सफाई कर्मचारी बघा.. माझं अंग छान स्वच्छ दुर्गंधीविरहीत राहावं म्हणून नेमलेले हे सफाई कर्मचारी ते तरी इमानेइतबारे आपलं काम करतात का.... या प्रश्नाचं तर उत्तरही अपेक्षित नाही..जितके नेमलेले सफाई कर्मचारी आहेत तितके जर रोज काम करु लागले...घाण करणाऱ्या तुम्हा प्रवाशांना रोखू लागले.. तर कुणाची बिशाद आहे का मला घाणेरडं स्टेशन म्हणायची.. नाही ना...पण मला घाणेरडं स्टेशन म्हटलं गेलं.. किती यातना झाल्या सांगु...असं ऐकताना...

माझ्या देहाचा सगळ्यात महत्वाचा भाग... जसा तुमचा असतो.. मणका वगैरे.. तसाच हे रेल्वेचे ट्रॅक...पण अहो त्यांनाही बरटवलं गेलंय.. कधी तुमची विष्ठा...तर कधी तुम्ही फेकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांनी.. कधी खाऊच्या पुड्यांनी.. तर कधी इकडे तिकडे बघत कुणी बघत नाही याची खातरजमा करत केलेल्या मुत्रविसर्जनानं.. अहो पण मी बघतो ना..मला ते सोसावं लागलं....

खोटं...धादांत खोटं...या प्रवाशांनी कचरा उचचला असता तर मी इतका घाण झालो असतो का? एवढा मोठा मी... एवढ्या लोकांना सामावून घेताना माझी दमछाक होते हो.. साधं वारही भिरभिरत नाही.. पण म्हणून मी तुम्हाला त्रास नाही ना देत...आता हा आयबीएन लोकमताचा प्रतिनिधी... यानंही बघितलं की, तुमचा घाणेरडापणा.. आणि तुमची दुट्टपी भूमिका..

ज्या दिवशी तुम्ही माझ्या अंगावर थुकणं थांबणार... जेव्हा सफाई कर्मचारी, रेल्वे पोलीस आपलं काम चोख बजावतील.. जेव्हा इथं बसणाऱ्या फेरीवाल्यांना बीएमसी दुसरीकडे नेईल.. जेव्हा इथं मलमुत्रविसर्जनासाठी रेल्वे योग्य व्यवस्था करे तो दिवस माझ्या 49 वर्षांच्या काळातला अत्यंत आनंदाच, सन्मानाचा दिवस असेल.. बाबांनो मला घाण करताना तुम्ही तुमचं घर घाण करताय असं मानाल ना..तेव्हा स्वच्छ स्टेशन मिशनच काय पण जगालाही माझ्या स्वच्छतेची दखल घ्यावी लागेल.

First published: May 20, 2017, 4:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading