Independence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा !

वीरपत्नी लहानबाई कोंडाजी मालुंजकर...त्यांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी आपला पती देशासाठी दिलाय. त्यांचे पती कोंडाजी मालुंजकर यांनी वयाच्या 23 व्या वर्षी देशासाठी बलिदान दिलंय

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2018 07:50 PM IST

Independence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा !

हरीश दिमोटे, अजित मांढरे,अहमदनगर, 14 आॅगस्ट : ४६ वर्षे... हो हो तब्बल ४६ वर्षे एक वीरपत्नी आपल्या हक्कासाठी लढा देतेय..पण काही मुठभर गावकरी आणि निष्क्रीय अधिकाऱ्यांमुळे या वीरपत्नीला वयाच्या ७० व्या वर्षी आपल्या हक्काची जमीन मिळालेली नाही.  वीरपत्नी लहानबाई कोंडाजी मालुंजकर...त्यांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी आपला पती देशासाठी दिलाय. त्यांचे पती कोंडाजी मालुंजकर यांनी वयाच्या 23 व्या वर्षी देशासाठी बलिदान दिलंय. १९६५ च्या भारत - पाकिस्तान युद्धात त्यांना वीरमरण आलंय. या बलिदानाबद्दल तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मांजुलकर परिवाराला दिलेलं हे गौरवपत्र...त्याचवेळी शासनाने लहानबाईंना उदरर्निवाह करता ओरंगपूर येथे १० एकर शेती देऊ केली होती. पण आज 46 वर्षे उलटूनही त्यांना या जमिनीचा ताबा मिळू शकलेला नाही. कारण स्थानिकांचा विरोध आणि शासकीय अधिकाऱ्यांचा निर्ढावलेपणा....

जर ओरंगपूरची जागा शहीद मालुंजकर परिवाराला दिली तर आम्ही गुरं कुठे चारायची? जागा दिल्यास आम्ही रक्ताचे टिळे लावू अशी धमकीच तिथले गावकरी देताहेत.

खरंतर या सर्वामागे राजकीय गणित असल्याचाही संशय बळावतोय. त्यावरुन आरोप प्रत्यारोप झालेत.

३ वेळा मोजणीचे पैसे भरले मोजणी करणारे आले ते ही पोलीस बंदोबस्ता शिवाय, तहशीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी देखील नैतिकता दाखवून येणं गरजेचं होतं मात्र, ते ही आले नाहीत. त्यामुळे ओरंगपुरकरांनी मोजणी होऊ दिली नाही. रक्ताचे टिळे लावू पण जमीन देणार नाही असा या ओरंगपूरकरांचा पवित्रा आहे. तर दुसरीकडे सातबारा लहानबाई मालुंजकर यांच्या नावावर असताना देखील त्यांच्या या जागेवर वन विभागाने झाडे लावून सरकारचा पैसा खर्च केला.

खरंतर या जमिनीचा ताबा मिळवून देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. पण सरकारी अधिकारी या शहीद कुटुंबाला कोर्टात जाण्याचा सल्ला देऊन सरळ हात झटकत आहेत. म्हणूनच आता न्यायालयानेच सुमोटो याचिका दाखल करून घेऊन या शहीद कुटुंबाला त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्याची गरज आहे.

PHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close