शेतकरी संपावर मुख्यमंत्री रिलॅक्स,अर्धे मंत्रीही मुंबई बाहेर

शेतकरी संपावर मुख्यमंत्री रिलॅक्स,अर्धे मंत्रीही मुंबई बाहेर

मुख्यमंत्र्यांनी काल शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. पण आज सरकार पातळीवर चर्चेसाठी काहीच हालचाल झाली नाही.

  • Share this:

01 मे : शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांनी  काल शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. पण आज सरकार पातळीवर चर्चेसाठी काहीच हालचाल झाली नाही.

गुरुवारी शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं असतांना आलेली मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रीया...एकूण सरकार शेतकऱ्यांच्या संपाला फारसं गांभीर्यानं घेतंय असं वाटत नाही...आता जरा एक नजरा टाकूया दुसऱ्या दिवशी शेतकरी आंदोलनाबाबत सरकार काही करत होतं का?

मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठक घेतली ती रायगडच्या नुतनिकरणाबाबत. यामध्ये जयकुमार रावलही उपस्थित होते

जपानशी आर्थिकसंबंध वाढवण्यासाठी बैठक घेतली

युवा आणि क्रीडाखात्यासोबत बैठक झाली.

म्हणजे आज दिवसभर मुख्यमत्र्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत शेतकरी संपाला अजिबात जागा नव्हती. आता जरा शेतकऱ्यांशी निगडीत खाते असलेले मंत्री काय करत होते

महादेव जानकर

मुंबईबाहेर

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबईबाहेर

पणनमंत्री सुभाष देशमुख

मुंबईबाहेर

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई बाहेर

मंत्री मुंबईबाहेर आणि मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर इतर विषय एकूण काय,  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करणं अपेक्षित असतांना सरकार मात्र रिलॅक्स वाटतंय.

संपाचं खापर विरोधकावर, मध्येच अण्णा हजारेंची मध्यस्थीची तयारी...एकूण या संपाला सामोरेजाण्याऐवजी, सरकार फुटपाडून संप मोडण्याचा प्रयत्न तर नाही करत ना असं भीती आता आंदोलक व्यक्त करतायत.

First Published: Jun 2, 2017 09:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading