गोष्ट पहिल्या शेतकरी आंदोलनाची !

गोष्ट पहिल्या शेतकरी आंदोलनाची !

फक्त आपल्याच नाही तर जगाच्या इतिहासाचं पुस्तक चंपारणच्या सत्याग्रहाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. एक तर हे गांधींजींचं पहिलं आंदोलन होतं आणि तेही नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी.

  • Share this:

02 जून : फक्त आपल्याच नाही तर जगाच्या इतिहासाचं पुस्तक चंपारणच्या सत्याग्रहाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. एक तर हे गांधींजींचं पहिलं आंदोलन होतं आणि तेही नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. गांधीजींनी मजुर आणि शेतकऱ्यांसाठी लढलेलं आणि जिंकलेलं हे पहिलं आंदोलन म्हणून याची ओळख आहे. 1917 ते 18 ह्या वर्षभरात हे आंदोलन लढलं गेलं.

बिहारच्या चंपारण जिल्ह्यात निळीचे मळे होते. निळ पिकवण्याची शेतकऱ्यांवर सक्ती करण्यात आली होती. मजुरांचंही मोठ्या प्रमाणात शोषण केलं जायचं. गांधीजींना इथल्या शेतकऱ्यांनी बोलावणं पाठवलं. गांधी प्रत्यक्षात गेले त्यावेळेस पहिल्यांदा त्यांना तिथून जायला सांगितलं. गांधीजींनी त्याला नकार दिला. गांधीजींना अटक करून कोर्टात हजर केलं गेलं. कोर्टाच्या बाहेर प्रचंड घोषणाबाजी होत होती. न्यायधीशांनी गांधीजींची मुक्तता केली. पण गांधीजींनी स्वत:च शिक्षेची मागणी केली. नंतर गांधीजींना सोडण्यात आलं.

चंपारणचा सत्याग्रह यशस्वी झाला. निळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची शोषणातून मुक्तता झाली. त्याच वेळेस पहिल्यांदा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भीतीपासून स्वतंत्र होण्याचा मंत्र दिला. तोच मंत्र घेऊन हजारो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच की शेतकऱ्यांना शोषणमुक्त करण्यासाठी गांधीजींनाही लढावं लागलं होतं आणि आजही त्याच पोशिंद्याला रस्त्यावर उतरवं लागतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 11:08 PM IST

ताज्या बातम्या