News18 Lokmat

अमित शहांचा मुंबई दौरा, मध्यावधी निवडणुकीची नांदी ?

अमित शहांचा निवडणुकांच्या दृष्टीनं रणनिती आखण्यासाठीचं जणु दौरा आहे अशा प्रकारच्या हालचालींमुळे मध्यावधी निवडणुकांचं बिगुल वाजलं तर आश्चर्य वाटायला नको.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2017 11:29 PM IST

अमित शहांचा मुंबई दौरा, मध्यावधी निवडणुकीची नांदी ?

सुवर्णा दुसाने,मुंबई

07 जून : पुढच्या आठवड्यात अमित शहा तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येतायत. तर सर्वात मोठी कर्जमाफीची घोषणा लवकरच करणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस सरकार करतंय. सत्तेतल्या शिवसेनेला बाजुला सारुन भाजप मध्यावधी निवडणुकांची रणनिती आखु पाहतेय का? याबद्दलचा हा रिपोर्ट

सोळा, सतरा आणि अठरा जून या तीन दिवसात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई भेटीवर आहेत. या भेटीदरम्यान ते भाजपचे सर्व मंत्री, आजी माजी प्रदेशाध्यक्ष, संघाचे ज्येष्ठ नेते, संघप्रचारक, त्याचवेळी बुथ पातळीवरचे कार्यकर्ते, वॉर्डरचनेनुसार काम करणारे पदाधिकारी या सगळ्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. तीन दिवसांच्या या भेटीदरम्यानं अमित शहा प्रसारमाध्यमांचे संपादक, विचारवंत यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीचा सगळा तपशील ऐकल्यावर उत्तर प्रदेशात निवडणुकीपुर्वी अमित शहांनी केलेल्या रणनितीचीच जणू पुनरावृत्तीच होतेय असं वाटतंय. आणि म्हणूनच महाराष्ट्रात सुद्धा मध्यावधी निवडणुकांची ही नांदी आहे का हा प्रश्न मनात येतो.

राज्यात शेतकरी संप आणि त्या निमित्तानं सरकारची झालेली कोंडी हा विषय ऐन भरात असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठ्या कर्जमाफीची घोषणा लवकरच करणार अशी घोषणा केलीये. त्यातच सत्तेत सहभागी असलेली शिवसेना नेहमीच विरोधकांची भूमिका बजावतेय. याच शिवसेनेनं बुधवारच्या कॅबिनेट बैठकीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्यानंतर भाजपनं बैठक सुरुचं ठेवली.

मध्यावधी निवडणुकांचं बिगुल वाजत असताना भाजप शिवसेनेला व्यवस्थित कॉर्नर करतंय. कर्जमाफीचं श्रेय शिवसेना आणि विरोधक या दोघांनाही मिळणार नाही याचीही तजवीज देवेंद्र फडणवीस सरकारनं व्यवस्थित केलीये असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यातच अमित शहांचा निवडणुकांच्या दृष्टीनं रणनिती आखण्यासाठीचं जणु दौरा आहे अशा प्रकारच्या हालचालींमुळे मध्यावधी निवडणुकांचं बिगुल वाजलं तर आश्चर्य वाटायला नको.

Loading...

असा असेल अमित शहांचा मुंबई दौरा

१६,१७, १८ जून मुंबई भेटीवर अमित शहा

भाजपचे सर्व मंत्री, आजी-माजी प्रदेशाध्यक्ष

संघाचे ज्येष्ठ नेते, संघप्रचारक यांची घेणार भेट

बुथ पातळीवरचे कार्यकर्ते,

वॉर्डरचनेनुसार काम करणारे पदाधिकारी यांची घेणार भेट

प्रसारमाध्यमांचे संपादक, विचारवंत यांचीही भेट

उत्तर प्रदेशात निवडणुकीपूर्वी अशीच होती रणनीती

त्याच रणनीतीची पुनरावृत्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...