S M L

मोदी सरकारने का केली लालबत्ती गुल ?

मोदी मंत्रिमंडळानं लाल बत्ती गुल करत व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय.

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2017 10:42 PM IST

मोदी सरकारने का केली लालबत्ती गुल ?

19 एप्रिल : पंतप्रधानांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आता कोणालाही त्यांच्या वाहनांवर लाल दिवा लावता येणार नाहीये. मोदी मंत्रिमंडळानं लाल बत्ती गुल करत व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय.

लाल दिव्याची गाडी दारात येणं हे अनेकांचं स्वप्नं असतं. मंत्री किंवा बडे प्रशासकीय अधिकाऱ्यांची खास ओळख म्हणजे त्यांची लाल दिव्याची गाडी...पण आता हीच ओळख पुसली जाणार आहे. याचं कारण म्हणजे आता केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या वाहनावर लाल दिवा लावता येणार नाहीये. लाल दिव्याचा वापर बंद करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाकडूनही प्रयत्न सुरू होते.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात बैठकही घेतली होती. या निर्णयाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे नवीन सुधारणेनुसार केंद्र आणि राज्य सरकारला लाल दिवा वापरण्याची मुभा देण्याचे अधिकारही नसतील असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय.

मोटार वाहना कायद्यात सरकारनं रद्द करत लाल दिव्याबाबतच कलमच काढून टाकलंय. पण रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस यांच्या वाहनांवर निळा दिवा (फ्लॅशरसह) लावता येईल असं जेटली स्पष्ट केलंय. तसंच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी निळा दिवा लावता येणार आहे. 1 मेपासून हा निर्णय लागू होणार असला तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या कारवरचा लाल दिवा आजपासूनच हटवला आहे.

लाल दिव्याबद्दल सगळीकडेच नाराजी वाढतच होती. लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांमधली दरी कमी व्हावी आणि व्हीआयपी संस्कृतीला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पण त्यामुळे आता अनेकांचं लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे.

Loading...
Loading...

लाल बत्ती गुल

मोटार वाहन कायद्यातलं लाल दिव्याबाबतच कलम रद्द

रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस यांच्या वाहनांवर फ्लॅशरसह निळा दिवा असेल

अत्यावश्यक सेवांच्या वाहनांवर निळा दिवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 08:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close