मराठी बातम्या /बातम्या /स्पेशल स्टोरी /

एका दिवसात 'योग' कसा जुळणार ?, दिग्गजांची झाली चांगलीच दमछाक

एका दिवसात 'योग' कसा जुळणार ?, दिग्गजांची झाली चांगलीच दमछाक

अनेक दिग्गजांनी योगा करण्यासाठी ठिकठिकाणी हजेरी लावली. यातल्या काही जणांनी सफाईदारपणे योगा केला. तर काहींची सवय नसल्यानं दमछाक झाली.

21 जून : आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा झाला. अनेक दिग्गजांनी योगा करण्यासाठी ठिकठिकाणी हजेरी लावली. यातल्या काही जणांनी सफाईदारपणे योगा केला. तर काहींची सवय नसल्यानं दमछाक झाली. आंतरराष्ट्रीय योग दिन ही कल्पना ज्यांनी मांडली त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये योगा केला. मोदी यांच्याकडे पाहून वाटतं की ते दररोज योगा करत असावेत. मोदींचा उजवा हात असलेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अहमदाबादेत बाबा रामदेव यांच्यासोबत योगा केला. खुद्द योगगुरू बाबा रामदेव यांच्यासोबत योगासन करताना अमित शहांची किती दमछाक झाली असेल कल्पना करा... नागपूरमध्ये योगा करताना नितीन गडकरींचंही काहीसं असंच झालं असावं.. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगा केला..त्यांनाही दररोजची सवय दिसत नाही. मुख्यमंत्र्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. त्यांच्या योगा करण्यात मात्र सफाईदारपणा होता. याच ठिकाणी जग्गूदादा म्हणजेच जॅकी श्रॉफनी योगा करताना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अण्णा हजारे योगा करण्यात कसे मागे राहतील..त्यांनी बंगळुरूमध्ये योगा केला. फिटनेसकडे विशेष लक्ष देणारी मलाईका अरोराकडे पाहून असं वाटतं की ती दररोज योगा करत असावी.. आंतरराष्ट्रीय योग दिन देशविदेशात मोठ्या उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणी नेते अभिनेत्यांनीही योगाला हजेरी लावली. यातून कळून आलं की कोण दररोज योगा करतो आणि कोण फक्त योग दिनाच्या निमित्तानं...
First published:

Tags: Yoga day, YogaDay 2017, योग दिन

पुढील बातम्या