शहरांनी शिकावं असं वेंगुर्ले नगरपरिषदेचं काम, कचऱ्यातून लाखांची कमाई

शहरांनी शिकावं असं वेंगुर्ले नगरपरिषदेचं काम, कचऱ्यातून लाखांची कमाई

मुळात कचरा साठूच दिला नाही तर शहर तर स्वच्छ राहतंच शिवाय भरघोस उत्पन्नही मिळतं.. हा धडा घालून दिलाय राज्यात स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवलेल्या सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले नगरपरिषदेने

  • Share this:

दिनेश केळुसकर,सिंधुदुर्ग

05 मे  : शहर म्हटलं की कचरा आला आणि कचरा म्हटलं की डंपिंग ग्राउंड.... पण मुळात कचरा साठूच दिला नाही तर शहर तर  स्वच्छ राहतंच शिवाय भरघोस उत्पन्नही मिळतं.. हा धडा घालून दिलाय राज्यात स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवलेल्या सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले नगरपरिषदेने... बघुया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट...

वेंगुर्ला राज्यातलं सर्वात स्वच्छ शहर ठरलंय. वेंगुर्लेकर आणि नगरपालिकेनं मिळून ही किमया केलीये.वेंगुर्ला हे खरं तर अवघ्या पंधरा सोळा हजार लोकवस्तीचं लहान शहर. पण इथेही रोज सकाळी शहरातल्या घराघरातून कचरा गोळा केला जातो आणि तो ही वेगवेगळ्या 23 प्रकारच्या वर्गीकरणानुसार...

इथला कचरा डेपोही थोडा वेगळाच आहे. कचराडेपोत शिस्तबद्ध काम चालतं.

Loading...

ओल्या कचऱ्यापासून मिथेन तयार केला जातो. त्यापासून वीजनिर्मिती होते. प्लास्टिक क्रश करुन रस्ते निर्मितीसाठी वापरलं जातं. पाल्यापाचोळ्यापासून गांडुळ खत तयार होतं. तर छोट्या काटक्यांपासून कांडी कोळसाही तयार होतो.

वेंगुर्ल्याचे मुख्याधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांनी दोन वर्षात ही किमया केलीये.

नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणतात, "यामध्ये कोकरे यांचा सिंहाचा वाटा आहे. ते सकाळी साडेसात वाजता बाहेर पडतात. घरच काम असल्यासारखं.. आणि त्यांची जी धडपड पाहून आम्ही सगळे नगरसेवक आणि स्टाफ पुर्णपणे त्यांच्या पाठिशी आहे ते सांगतील तसं सहकार्य आम्ही त्यांना करतोय"

अशा सामूहिक इच्छाशक्तीमुळे कचरामुक्त वेंगुर्ला शक्य झालाय. म्हणूनच राज्यातली सर्वात स्वच्छ क वर्गाची नगरपरिषद म्हणून वेंगुर्ल्याला अडीच कोटीचं बक्षीस देऊन राज्य सरकारनं गौरव केलाय.

वेंगुर्ले शहराच कचरा नियोजन हे झिरो डंपिंग या तत्वानुसार राबवलं जातोय आणि त्यामुळेच हा कचरा डेपो डेपो न राहता पर्यटन स्थळ झालंय.

कचरा प्रक्रीयेतून वेंगुर्ला नगरपरिषदेला दर महिन्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये मिळतायत. सिंधुदुर्गातल्या सर्व किनारपट्टीच्या गावातलाही कचरा आता वेंगुर्ले नगरपरिषद घेणार आहे. म्हणूनच वेंगुर्ल्यासाठी घनकचरा हा धनकचरा झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...