सरकार विरूद्ध सरकार, युतीत चाललंय काय ?

ज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार आहे पण नाशकातल्या शेतकरी मेळाव्यात जी भाषणं ऐकायला मिळाली ती ऐकली तर सरकारमध्ये कोण आहे आणि विरोधक कोण आहे हे कळणारच नाही.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 20, 2017 12:00 AM IST

सरकार विरूद्ध सरकार, युतीत चाललंय काय ?

कपिल भास्कर, नाशिक

19 मे : सरकार विरूद्ध सरकार. ही अवस्था आहे देवेंद्र सरकारची... राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार आहे पण नाशकातल्या शेतकरी मेळाव्यात जी भाषणं ऐकायला मिळाली ती ऐकली तर सरकारमध्ये कोण आहे आणि विरोधक कोण आहे हे कळणारच नाही.

व्यासपीठ शिवसेनेचं आहे आणि जी जोरदार भाषणं होतायत त्यात सध्याच्या सरकारची लक्तरं काढली जातायत. ही लक्तरं फक्त मेळाव्याला आलेल्या लोकांनीच काढली असं नाही तर खुद्द उद्धव ठाकरेंनीही काढली.

शिवसेनेचा डोळा आहे तो शेतकऱ्यांच्या मतांवर. त्यामुळे एकाच वेळेस सरकारमध्ये राहुन विरोधकांची भूमिकाही पार पाडण्याची कसरत सेना पार पाडतेय. कर्जमुक्ती दिली तर सरकार पडू देणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी घोषित केलंय.

शिवसेनेनं शेतकऱ्यांचे वेगवेगळे आवाज एकत्र करायलाही सुरुवात केलीय. स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत मंत्री आहेत आणि ते भाजपमय झालेले आहे. तर राजू शेट्टी हे सेनेच्या व्यासपीठावर.

Loading...

शिवसेनेनं सध्या समृद्धी हायवेच्याविरोधात आवाज उठवलाय. शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा मोबदला मिळालाच पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही पण समृद्धीवर राजकारण केलं तर हायवे कसे होणार, रस्त्यांचं जाळं तयार नाही झालं तर महाराष्ट्राची समृद्धी कशी होणार? सत्ताधारी शिवसेनेला याचीही उत्तरं शोधावी लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 09:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...