'मार्शल'ची थाटात सेवानिवृत्ती, सांगली पोलिसांकडून लाडक्या मित्राला निरोप

'मार्शल'ची थाटात सेवानिवृत्ती, सांगली पोलिसांकडून लाडक्या मित्राला निरोप

सांगली जिल्ह्यातील अनेक घटना, गुन्ह्यांचा साक्षीदार असलेला जिल्हा पोलीस दलातील 'मार्शल' हा बॉम्बशोधक पथकात काम करीत होता

  • Share this:

आसिफ मुरसल,सांगली

सांगली, 18 एप्रिल : सांगली जिल्ह्यातील अनेक घटना, गुन्ह्यांचा साक्षीदार असलेल्या जिल्हा पोलीस दलातील 'मार्शल'ल नऊ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालाय. पोलीस दलातर्फे त्याला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील अनेक घटना, गुन्ह्यांचा साक्षीदार असलेला जिल्हा पोलीस दलातील 'मार्शल' हा बॉम्बशोधक पथकात काम करीत होता. ४ आॅगस्ट २००९ रोजी तो सेवेत दाखल झाला होता. त्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यातील सुरक्षेचा आढावा घेण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. कवलापूर (ता. मिरज) येथे २०१६ मध्ये विहिरीतील गाळ काढताना बॉम्ब सापडला होता. तोही मार्शलनेच शोधून दिला होता. त्याची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली. तो अनेक घटनांचा साक्षीदार राहिला.

नऊ वर्षाच्या सेवेनंतर तो सोमवारी निवृत्त झाल्याने जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे यांच्याहस्ते मार्शलचा सत्कार करण्यात आला. मार्शल श्वानाची सेवानिवृत्तीनिमित्त सजविलेल्या जीपमधून मिरवणूक काढली.

दरम्यान, मार्शलची देखभाल हे पोलीस हवालदार संजय कोळी करत होते, तो त्यांच्याच सवयीचा होता. त्यामुळे मार्शल निवृत्त झाल्यावर त्याच्या संगोपणाची जबाबदारी पोलीस हवालदार संजय कोळी यांनी घेतली आहे.

यावेळी पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, पोलीस निरीक्षक, बॉम्बशोधक पथकाचे उपनिरीक्षक हवालदार, तसंच मार्शलला हाताळणारे पोलीस नाईक संजय कोळी आणि समीर सनवी उपस्थित होते.

First published: April 18, 2018, 9:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading