असं आहे राष्ट्रपती भवन !

असं आहे राष्ट्रपती भवन !

राष्ट्रपती म्हटलं की, त्यांचा राजेशाही थाट मनात भरतो. विशेष म्हणजे इंग्लंडची राणी जशी राजवाड्यात राहते तसंच आपले राष्ट्रपतीही राजवाडा असलेल्या राष्ट्रपती भवनमध्ये रहातात. पाहुयता हे भवन कसं आहे?

  • Share this:

20 जुलै : रामनाथ कोविंद हे आपले 14 वे राष्ट्रपती म्हणून अधिकृतपणे आता सुत्रे हाती घेतील. राष्ट्रपती म्हटलं की, त्यांचा राजेशाही थाट मनात भरतो. विशेष म्हणजे इंग्लंडची राणी जशी राजवाड्यात राहते तसंच आपले राष्ट्रपतीही राजवाडा असलेल्या राष्ट्रपती भवनमध्ये रहातात. पाहुयता हे भवन कसं आहे?

भव्य दिव्य काय असतं याचा नमुना बघायचा असेल तर आपल्या राष्ट्रपती भवनसारखी दुसरी वास्तू नाही. हेच ठिकाण आता भारताच्या 14 व्या म्हणजेच रामनाथ कोविंद यांचं निवासस्थान असेल. राष्ट्रपतींचं कामकाजही ह्याच वास्तूतून चालते. एवढंच नाही तर  परदेशी पाहुण्यांचं स्वागतही ह्याच राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात पार पडतं.

ब्रिटीशांनी ज्यावेळेस राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस व्हाईसरॉय हाऊस बांधण्याची योजना आखली आणि आता तेच व्हॉईसरॉय हाऊस हे राष्ट्रपती भवन म्हणून ओळखलं जातं. पहिल्या महायुद्धाच्या अगोदर दोन वर्षे म्हणजे 1912 साली ह्या राष्ट्रपती भवनच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1929 साली ते पूर्ण झालं. म्हणजे एवढी भव्यदिव्य वास्तू उभी रहायला जवळपास 17 वर्षे लागली.

या वास्तुचे आर्किटेक्चर होते एडवीन लुटयेन्स. त्यांच्याच नावानं अजूनही उच्चपदस्थ रहात असलेल्या दिल्लीला लुटेयन्स दिल्ली म्हणून ओळखलं जातं. 330 एकरवर एच आकारात हे राष्ट्रपती भवन बांधण्यात आलंय. जवळपास अडीच किलोमीटरचा कॉरीडॉर आहे ज्यात 340 रूम्स उभारण्यात आल्यात. राष्ट्रपती भवन बांधण्यासाठी 23 हजार कामगार काम करत होते. त्यावेळेस ह्या भवनच्या बांधकामाचं बजेट होतं 1 कोटी 40 लाख. 1931 मध्ये राष्ट्रपती भवनचं उदघाटन झालं.

राष्ट्रपती भवनमध्ये 190 एकरवर गार्डन पसरलेली आहे. ब्रिटीश आणि मुघल शैलाचा त्यासाठी वापर करण्यात आलाय. टुलिपची फुलं पहाण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात लोकांसाठी ह्या बागा खुल्या असतात. राष्ट्रपती भवनात प्रत्येक गोष्ट आहे. भव्य लायब्ररीत पुस्तकांचा मोठा ठेवा आहे तसंच ऐतिहासिक पेंटीग्जचंही जतन करण्यात आलंय. राष्ट्रपती भवन जरी मोठं असलं तरीसुद्धा एका गेस्ट विंगमध्येही रहाणं बहुतांश राष्ट्रपतींनी पसंत केलंय.

First published: July 20, 2017, 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading