राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडले, पुढे काय ?

राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडले, पुढे काय ?

आता सरकार शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत नसल्याचं सांगत राजू शेट्टी बाहेर पडलेत. पण भाजपमधून किंवा अगदी सरकारमधूनही कुणीचं या गोष्टीला फारस महत्त्व दिलेल दिसत नाहीये.

  • Share this:

वैभव सोनवणे,पुणे

31 आॅगस्ट : तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होत असल्याचं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी सत्तेत सहभागी झाले होते. आता सरकार शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत नसल्याचं सांगत राजू शेट्टी बाहेर पडलेत. पण भाजपमधून किंवा अगदी सरकारमधूनही कुणीचं या गोष्टीला फारस महत्त्व दिलेल दिसत नाहीये.

अखेर अपेक्षित होतं तेच घडलं. हे सरकार शेतकऱ्याचं नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सरकारशी काडीमोड घेतल्याचं जाहीर केलं.

सध्याची परिस्थिती पाहाता सरकारला शेट्टी यांच्या भूमिकेने काहीच फरक पडत नाहीये. उलट यापूर्वीचं संघटनेचा खंदा शिलेदार सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून भाजपनं शेट्टींवर कुरघोडी करण्यात यश मिळवलं होतं. वस्त्रोद्योग महामंडळाच्या तुपकरांनीही आपला राजीनामा दिलाय.

फारसं राजकीय बळ नसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना उपद्रवमूल्य मात्र चांगलं सांभाळून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला घेरणं आणि संघटना बळकट करायला राजू शेट्टींना वेळ मिळणार आहे.

मुळात आंदोलनाच्या जीवावर उभी असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेत गेल्यापासून सरकारविरोधी भूमिका घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे कार्यकर्ते चिडले होते. संघटना आणि तिची ताकद कायम ठेवायची असेल तर राजू शेट्टींसमोर सरकारमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading