गेले विखे कुणीकडे ?, मतदारसंघात शेतकरी संप, विखे पाटील मात्र परदेशात

स्वतःच्या मतदारसंघात सरकारविरोधी आंदोलनाचा भडका उडालेला असताना विखे पाटील कुठेच नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2017 09:25 PM IST

गेले विखे कुणीकडे ?, मतदारसंघात शेतकरी संप, विखे पाटील मात्र परदेशात

हरिश दिमोटे, पुणतांबा

02 जून : शेतकऱ्यांच्या संपाचा उद्रेक सुरू असताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मात्र गायब आहेत. स्वतःच्या मतदारसंघात सरकारविरोधी आंदोलनाचा भडका उडालेला असताना विखे पाटील कुठेच नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

लाखांचा पोशिंदा शेतकरी राजा निर्वाणीवर आलाय. तो कालपासून संपावर आहे. ज्या पुणतांब्यात या शेतकरी संपाची पहिली ठिणगी पडली त्या पुणतांब्याचे आमदार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मात्र गायब आहेत. शेतकऱ्यांनी जेव्हा संपाची हाक दिली तेव्हा विखे पाटलांनी एका गटाला घेऊन मुंबई गाठली. तिथं वर्षावर शेतकऱ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण संपकरी शेतकऱ्यांमध्ये विखे पाटील फूट पाडत असल्याचा आरोप झाला.

1 जून पासून शेतकरी संपावर गेला. नगर जिल्ह्यातील पुणतांबा, शिर्डी भागात आंदोलनाचं सर्वाधिक लोण असताना राधाकृष्ण विखे पाटील गायब आहेत. ते परदेशात असल्याची माहिती मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या संतापात भर पडलीये.

राधाकृष्ण यांचे भाऊ अशोक विखे पाटील स्वतः आंदोलनात उतरलेत. राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकरी विरोधी असल्याची टीका त्यांनी केलीये.

Loading...

सरकारविरोधात जनमत तयार होतंय म्हटल्यावर विरोधकांसाठी ही सुवर्णसंधी....पण राधाकृष्ण विखे पाटील अशी संधी का सोडतायेत. त्यांच्या मनात नेमकं आहे काय? असे एक ना शंभर सवाल शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना पडलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 09:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...