स्पेशल रिपोर्ट : विकासाच्या नावाखाली पुण्याची फुफ्फुसं निकामी !

स्पेशल रिपोर्ट : विकासाच्या नावाखाली पुण्याची फुफ्फुसं निकामी !

पुणे महापालिका कोथरूड ते पाषाण भुयारी मार्ग काढणार आहे. पण या भुयारी मार्गामुळे जैवविविधतेनं नटलेली टेकडी उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या मार्गाला विरोध केलाय.

  • Share this:

अद्वैत मेहता,पुणे

17 मे : वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पुणे महापालिका कोथरूड ते पाषाण भुयारी मार्ग काढणार आहे. पण या भुयारी मार्गामुळे जैवविविधतेनं नटलेली टेकडी उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या मार्गाला विरोध केलाय. या निमित्तानं पुण्यातल्या हिरव्यागार टेकड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

आयटी हब असलेल्या पुण्यातल्या वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भरच पडतेय. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेनं टेकड्यांमधून भुयारी मार्गाचा प्रस्ताव मांडलाय. पण या मार्गामुळे पाषाण परिसरातील पंचवटी भागात राहणारे लोक नाराज झालेत. कारण इथल्या हिरवाईनं नटलेल्या समृद्ध टेकड्या उद्धवस्त होणार आहेत.

टेकड्या या पुण्याची फुफ्फुसं आहेत. या हिरव्यागार टेकड्यांमुळे पुण्याचा गारवा कायम आहे. भुयारी मार्गासाठी या टेकड्या फोडणं म्हणजे पुण्याच्या जैवविविधतेला नख लावण्यासारखं आहे. या भुयारी मार्गापेक्षा कोथरुड ते अभिमानश्री सोसायटी असा मार्ग काढला तर निसर्गाचं नुकसान न होता कमी खर्चात वाहतूक व्यवस्था होईल, असा पर्याय नागरिकांनी सुचवलाय.

दिवसेंदिवस पुणे शहर बकाल होतंय. इथल्या टेकड्या, त्यावरची निसर्गसंपदा नष्ट होत चाललीय. विकास तर व्हायला हवा..पण तो निसर्गाचा ऱ्हास करणारा नसावा.

जैवविविधता कायम ठेवून पर्यायी मार्ग काढणं शक्य आहे. पण विकासाच्या नावाखाली तात्कालिक उपायांच्या पलीकडे जाऊन दूरगामी योजना आखण्याची गरज आहे. निसर्गावर, पर्यावरणावर घाला घालून केलेला विकास शहराला भकास करून जाईल हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.

First published: May 17, 2017, 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading