S M L

धरणांच्या जिल्ह्यात आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांवर हे असलं गढूळ पाणी प्यावं लागतं...पण हे पाणी सहज मिळत नाही...

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2017 07:50 PM IST

धरणांच्या जिल्ह्यात आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

विजय राऊत, जव्हार, पालघर.

29 एप्रिल : धरणांचा जिल्हा म्हणून पालघरची ओळख आहे. पण याच पालघरमध्ये एक हंडा पाण्यासाठी आदिवासींना मैलोंनमैल पायपीट करावी लागते.

पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांवर हे असलं गढूळ पाणी प्यावं लागतं...पण हे पाणी सहज मिळत नाही...या पाण्यासाठी करावी मैलमैलभराची पायपीट...धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या पालघरमध्ये उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई सुरू होते. एक हंडा पाणी मिळवण्यासाठी आदिवासींनी दिवसरात्र एक करावी लागते. तासंनतास विहिरीचा तळ खरवडल्यावर हाती लागते ते हंडाभर पाणी...कधीतरी सरकारी पाण्याचा टँकर येतो आणि भुर्रर्रकन निघून जातो. शासकीय अधिकारी मात्र टँकरची संख्या आणि फेऱ्यांचं गणित सांगतात.

पाणीटंचाई निवारणाचे आराखडे आखले जातात ते कधीच पूर्ण होत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर येणारी पाणीटंचाई आदिवासींसाठी नित्याचीच झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2017 07:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close